Home मनोरंजन प्रभुदेवा: Prabhudeva Marriage: प्रभुदेवाने केलं फिजिओथेरपिस्टशी लग्न, आता भावाने सांगितलं सत्य -...

प्रभुदेवा: Prabhudeva Marriage: प्रभुदेवाने केलं फिजिओथेरपिस्टशी लग्न, आता भावाने सांगितलं सत्य – prabhu deva married to doctor himani in chennai


मुंबई- प्रभुदेवाच्या लग्नाबद्दल वेगवेगळे अनुमान काढले जात आहेत. यासंदर्भात अनेक बातम्या आतापर्यंत समोर आल्या आहेत. यात प्रभुदेवा त्याच्या भाचीशी लग्न करणार असल्याचं म्हटलं गेलं. तर काही दिवसांनी त्याने फिजिओथेरपिस्टशीच लग्न केल्याचं वृत्त समोर आलं. प्रभुदेवाच्या भावाने आता याबद्दल संपूर्ण माहिती दिली. इथे वाचा संपूर्ण प्रकरणाची सत्यता..

प्रभुदेवा दोन महिन्यांपासून होता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये

ई-टाइम्सच्या एका विशेष रिपोर्टनुसार प्रभुदेवाने मुंबईच्या साकीनाका येथे राहणाऱ्या डॉ. हिमानीशी केले आहे. सततच्या कामामुळे प्रभुदेवाला पाठ आणि पाय दुखीचा त्रास सुरू झाला होता. यावरील उपचारांसाठी त्याने फिजिओथेरपीची ट्रिटमेन्ट सुरू केली होती. याचकाळात प्रभुदेवा आणि डॉ. हिमानी यांची ओळख झाली. अवघ्या काही महिन्यांमध्ये दोघांची चांगली मैत्री झाली आणि दोघं एकमेकांच्या प्रेमातही पडले.

लॉकडाउन दरम्यान दोघं मार्चमध्ये चेन्नईला गेले होते. तेथे दोन महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. यानंतर त्यांनी मे महिन्यात तिथेच लग्न केलं. प्रभुदेवाच्या चेन्नईच्या घरी हे लग्न झालं. लॉकडाउनमुळे कोणालाही बोलावण्यात आलं नाही.

प्रभुदेवाच्या लग्नामुळे त्याचं कुटुंब आनंदी

आतापर्यंत डॉ. हिमानी प्रभुदेवाच्या कुटुंबियांना दोनदा मैसूरमध्ये भेटली आहे. सासरच्यांना भेटून तिला आनंद झाल्याचंही तिने म्हटलं. प्रभुदेवाचा भाऊ राजू सुंदरम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ईटाइम्सला सांगितले की, ‘प्रभुदेवाच्या लग्नामुळे आम्ही सर्वच खूप आनंदी आहोत.’

दरम्यान, प्रभुदेवाच्या पहिल्या पत्नीचं नाव रामलता आहे. त्यांना तीन मुलं होती. त्यातील एका मुलाचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. प्रभुदेव अभिनेत्री नयनताराच्या प्रेमात पडल्यामुळे त्याचं पत्नीसोबतचं नातं बिघडलं. दोघांमध्ये अंतर पडलं आणि दोघांनीही लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नयनताराही त्याच्या आयुष्यातून निघून गेली. आता प्रभुदेवा डॉ. हिमाशीसोबत लग्न करून आनंदी आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments