Home ताज्या बातम्या प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन, दोन दिवसापूर्वीच झाला होता संगीतकार भावाचा मृत्यू...

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन, दोन दिवसापूर्वीच झाला होता संगीतकार भावाचा मृत्यू gujarati films actor turned politician naresh kanodia dies at 77 2 days after his brother died mhjb | News


नरेश कनोडिया (Naresh Kanodia) कोरोनामुळे संक्रमित झाल्यानंतर त्यांच्यावर अहमदाबाद (Ahmedabad) च्या यूएन मेहता इंस्टीट्यूट (UN Mehta Institute)मध्ये उपचार सुरू होते.

मुंबई, 27 ऑक्टोबर : गुजराती सिनेमातील सुपरस्टार नरेश कनोडिया  (Naresh Kanodia) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे संक्रमित झाल्यानंतर त्यांच्यावर अहमदाबाद (Ahmedabad) च्या यूएन मेहता इंस्टीट्यूट (UN Mehta Institute) मध्ये उपचार सुरू होते. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गुजराती फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

अभिनेता नरेश कनोडिया यांची गुजराती इंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन अशी ओळख आहे. त्यांनी गुजराती भाषेत शेकडो सिनेमा केले आहेत. त्यांचा मुलगा हितू कनोडिया देखील गुजराती अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे तर भाऊ  महेश कनोडिया (Mahesh Kanodia) हे भाजपचे राज्यसभा सदस्य होते. महेश हे उत्तम संगीतकार आणि गीतकार होते.  महेश-नरेश या जोडीने काही चित्रपटांना संगीत दिले होते. दोन दिवसांपूर्वी महेश यांचा मृत्यू झाला होता. ते 83 वर्षांचे होते. महेश यांच्या निधनांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला होता.

गुजरातच्या मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्वीट करून नरेश यांना श्रद्धांजली दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ‘गुजराती चित्रपटांचे सुपरस्टार आणि भाजप नेता नरेश भाई कनोडिया यांच्या निधनामुळे मला अत्यंत दु:ख झाले आहे. सामाजिक आणि कला क्षेत्रातील त्यांचे योगदान नवीन पीढीला प्रेरणा देईल.’

(हे वाचा-‘ती’ ड्रग पार्टी नव्हतीच! करण जोहरच्या पार्टीत आलेल्या कलाकारांना NCBचा दिलासा)

महेश कनोडिया यांच्या मृत्यू वृद्धापकाळातील आजारामुळे 83व्या वर्षी मृत्यू झाला. त्यानंतर दोनच दिवसात त्यांचा भाऊ नरेश कनोडिया यांचे कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुजरात फिल्म इंडस्ट्रीसाठी या दोन्ही घटना धक्कादायक आहेत. इंडस्ट्रीतील दोन महत्त्वाचे तारे निखळल्याचे दु:ख अनेकांनी व्यक्त केले आहे.


Published by:
Janhavi Bhatkar


First published:
October 27, 2020, 2:02 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik News : टपाल विभागाचे खासगीकरण नकोच – don’t reject the privatization of the postal department

म. टा. प्रतिनिधी, नाशिकखासगीकरणाच्या विरोधासह अन्य २१ मागण्यांसाठी टपाल युनियन शुक्रवारी (दि.२७) संपावर जाणार आहे. कामबंद ठेवण्यात येणार असल्याने तसेच शनिवारी व रविवारी...

aurangabad News : दक्षता घ्या, पुन्हा ‘लॉकडाऊन’ नकोच – be careful, don’t ‘lockdown’ again

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना संसर्गाच्या संकटाशी सामना करण्यासाठी व्यापारीवर्गान वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. अनेक महिने सर्व बाजारपेठ बंद होती. त्यामुळे आर्थिक गणित बिघडले...

Uddhav Thackeray: Uddhav Thackeray: लॉकडाऊन काळात नोकऱ्यांवर गदा; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश – cm uddhav thackeray gave directions on job crisis

मुंबई:करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक तरुणांचे हातचे रोजगार गेले आहेत. त्याचवेळी नव्याने रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच या रोजगारांच्या अनुषंगाने...

Recent Comments