Home शहरं अहमदनगर प्लाझ्मा थेरपी: नगरमध्ये प्लाझ्मा थेरपीची चाचपणी सुरू - plasma therapy testing begins...

प्लाझ्मा थेरपी: नगरमध्ये प्लाझ्मा थेरपीची चाचपणी सुरू – plasma therapy testing begins in ahmadnagar


म.टा.प्रतिनिधी, नगर

नगरमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. आता या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. करोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

करोनातून रुग्ण बरे झाल्यानंतर १० दिवसानंतर आणि २८ दिवसाच्या आत प्लाझ्मा दान केले पाहिजे. त्यामुळे रुग्णांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. तेथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही त्यांचे समुपदेशन करून याचे महत्व पटवून द्यावे, असेही द्विवेदी म्हणाले. नगर शहरात सध्या पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेची काळजी न घेता नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. पुन्हा सक्तीचे लॉकडाउन टाळायचे असेल तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, अत्यावश्यक असेल तर चेहऱ्यावर मास्क घालून घराबाहेर पडावे. कोणत्याही परिस्थितीत करोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कशी असते प्लाझ्मा थेरपी?

प्लाझ्मा थेरपीमध्ये करोनातून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तातील घटक घेतले जातात. त्यातून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा करोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते, तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. करोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी करोनाशी लढलेले असतात. त्यामुळेच जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्याची गरज आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

anil deshmukh: म्हणून CBIबाबत ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय; गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण – maharashtra government has revoked its order of the ‘general consent’ given to...

मुंबईः 'सीबीआय ही प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे, पण त्याचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची चर्चा आहे, त्यामुळंच सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय...

Eknath Khadse: Eknath Khadse: खडसे उद्या करणार मोठा धमाका!; ‘हा’ दावा भाजपची झोप उडवणारा – 15 to 16 former mlas with me says eknath...

जळगाव: माझ्यासोबत १५ ते १६ माजी आमदार आहेत. ते माझ्यासोबत उद्या मुंबईत येणार आहेत. काही विद्यमान आमदारही माझ्यासोबत आहेत, पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे...

rr vs srh: RR vs SRH: राजस्थान विरुद्ध हैदराबाद- पराभव होणार संघ IPL 2020 बाहेर – rr vs srh ipl 2020 rajasthan royals vs...

दुबई: आयपीएलचा १३व्या हंगामातील अर्ध्याहून अधिक सामने झाले आहेत. पण अद्याप कोणताही संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. स्पर्धेतील या पुढील एक...

Recent Comments