Home ताज्या बातम्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या महिलेला दिला धक्का, समोरून आली मेट्रो आणि..., पाहा CCTV...

प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या महिलेला दिला धक्का, समोरून आली मेट्रो आणि…, पाहा CCTV VIDEO new york man pushed woman on metro track cctv video viral mhpg | Viral


एका व्यक्तीनं 40 वर्षीय महिलेला मेट्रो ट्रेन येण्यापूर्वी ट्रॅकवर ढकलले, ज्यामुळे ती महिला मेट्रो ट्रेनच्या खाली आली.

न्यूयॉर्क, 21 नोव्हेंबर : अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. इथं एका व्यक्तीनं 40 वर्षीय महिलेला मेट्रो ट्रेन येण्यापूर्वी ट्रॅकवर ढकलले, ज्यामुळे ती महिला मेट्रो ट्रेनच्या खाली आली. ही घटना 14 पथ-युनियन स्क्वेअर स्टेशन जवळ घडली. या सगळा प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

दरम्यान, या महिलेचे नशीब चांगले होते, त्यामुळे ट्रॅकवर पडूनही या महिलेचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये असे दिसून येते की काही लोक स्टेशनवर उपस्थित आहेत आणि ट्रेनची वाट पहात आहे. मेट्रो ट्रेन येताच एका व्यक्तीने अचानक महिलेला धक्का दिला, आणि महिला मेट्रो खाली आली. या महिलेला मेट्रो ट्रॅकवर टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव आदित्य वेमुलापती असून त्याचे वय 24 वर्ष असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

वाचा-अरेरे! आधी 25 कोटींची गाडी ठोकली, मग बनवला VIDEO; बाबांना दाखवला आणि…

वाचा-ऊसाच्या शोधात हत्ती पोहोचला गावात; रागाच्या भरात घातला गोंधळ, पाहा Viral Video

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य बेघर आहे त्याच्यावर खुनाचा खटला सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांमध्ये कोणतेही संभाषण झाले नाही किंवा दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. त्यामुळे आदित्यनं महिलेला का धक्का दिला, याचा तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने धक्का दिल्यानंतर लगेचच त्यानं एमटीए ट्रेन सर्व्हिस सुपरवायझरकडे आत्मसमर्पण केले.

वाचा-ज्यानं शिंकरलं नाक त्याच रूमालानं पुसला चेहरा; ट्रम्प यांच्या वकिलांचा VIDEO

जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले जेथे तिची प्रकृती स्थिर आहे. घटनेच्या 14 तासांआधी एका व्यक्तीनं न्यूयॉर्क शहरात एका व्यक्तीला मारहाण करून मेट्रोच्या ट्रॅकवर फेकले होते. मेट्रो प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोव्हिड-19 आणि बेरोजगारीमुळे लोकं हतबाल झाली आहेत. परिणामी मानसिक आरोग्यानं लोकं ग्रस्त आहे.


Published by:
Priyanka Gawde


First published:
November 21, 2020, 1:27 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

proposal to allow corporate house to set up banks: कॉर्पोरेट्सचा बँकिंग प्रवेश – rajiv madhav joshi article on proposal to allow corporate houses to...

राजीव माधव जोशी आपली बँकिंग सिस्टीम सक्षम व्हावी म्हणून अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार पतसंस्था व बिगर बँकिंग कंपन्यांना नवीन बँक स्थापन करण्याची मुभा...

trp case: टीआरपीप्रकरणी मीडिया ट्रायल नको – bombay high court has directed news channel should not media trial in trp case

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले असताना, या खटल्यावर प्रभाव टाकणारे मीडिया ट्रायल वाहिन्यांकडून होऊ नये. त्यादृष्टीने...

Sourav Ganguly Announced 5 T 20 Match – करोना काळात हा संघ येणार भारत दौऱ्यावर; BCCIकडून घोषणा

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने...

Recent Comments