Home शहरं पुणे फडणवीसांचे आरोपास्त्रभाजपवर बूमरँग

फडणवीसांचे आरोपास्त्रभाजपवर बूमरँगम. टा. प्रतिनिधी, पुणे

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेवर केलेल्या आरोपांमुळे पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपलाच रनआउट होण्याची वेळ आली. फडणवीस यांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या वादग्रस्त संघटनेला मुंबई महापालिकेने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याच्या दिलेल्या जबाबदारीवर जोरदार टीका केली होती. पण त्यांच्याच पक्षाच्या ताब्यातील पुणे महापालिकेनेही त्याच संघटनेला काम दिल्याचे उघड होताच पुण्याच्या कारभाऱ्यांची एकच धावपळ उडाली. अखेर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संघटनेचे काम थांबविण्याची विनंती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना केली.

फडणवीस यांनी मुंबई महापालिकेने ‘पीएफआय’ संघटनेला करोनाबाधीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास दिलेल्या जबाबदारीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेला मंगळवारी लक्ष्य केले. फडणवीस यांच्या टीकेचा ‘व्हीडीओ’ व्हायरल होताच पुण्यातही त्याचे पडसाद उमटले. भाजपच्याच ताब्यातील महापालिकेने पुण्यातही ‘पीएफआय’ आणि मूलनिवासी मुस्लिम संघ या दोन संस्थेस जबाबदारी दिल्याचे लक्षात आले आणि कारभाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. महापौर मोहोळ यांनी तत्काळ आयुक्त गायकवाड यांनी पत्र देत ‘पीएफआय’ला दिलेली जबाबदारी रद्द करण्याची विनंती केली आहे. तसेच, पदाधिकाऱ्यांना कल्पना न देता काम कसे देण्यात आले, याचाही खुलासा मागविला. नातेवाइकांनी कायदेशीर हक्क सोडलेले आणि पोलिसांनी पंचनामा केलेल्या कोणत्याही धर्माच्या रुग्णाच्या शवावर त्याच्या धर्मानुसार अंत्यविधी करण्यासाठी काही संस्थांनी तयारी दर्शविली होती. त्यानुसार महापालिका आयुक्त गायकवाड यांनी १३ एप्रिल रोजी आदेश काढून या दोन्ही संस्थांना परवानगी दिली.

……..

Bफडणवीसांचे आरोप B

‘करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या मुस्लिम रुग्णाचे शव ‘पीएफआय’ला देण्याचा आदेश मुंबई महापालिकेने काढला आहे. या संघटनेवर देशविरोधी आणि समाजविरोधी काम केल्याचा आरोप आहे. केरळ, कर्नाटक, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ही संघटना प्रतिबंधित करण्यावर कारवाई सुरू आहे. ‘सीएए’च्या दरम्यान देशभरात झालेल्या दंगलीमध्ये या संघटनेकडून पैसा पुरविल्याचा आरोप असून ‘ईडी’ने अकाउंट्स प्रसिद्ध केले आहेत. देशविघातक कृत्य करणाऱ्या संस्थेला अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देण्याचा निर्णय कितपत योग्य आहे,’ असा सवाल फडणवीस यांनी ठाकरे यांना केला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PMJJY available in Postal Payment bank: PMJJY जीवन ज्योती योजना; पोस्ट पेमेंट बँकेतही मिळणार जीवन ज्योती विमा – jeevan jyoti yojana now available in...

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्येही (आयपीपीबी) आता पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आयपीपीबीने पीएनबी मेटलाइफ...

father and son found dead in apegaon paithan: बिबट्या जाळ्यात येईना; तीन जिल्ह्यात दहशत – father and son found dead in apegaon paithan due...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादबिबट्याने केलेल्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील आपेगाव शिवारात घडल्यानंतर या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पैठण परिसरातील...

Recent Comments