Home शहरं नागपूर फडणवीसांच्या राजीनाम्याची राष्ट्रवादीची मागणी

फडणवीसांच्या राजीनाम्याची राष्ट्रवादीची मागणीम. टा. प्रतिनिधी, नागपूर

शहरातील जनता करोनाविरुद्ध लढत असताना माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपुरातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. हा जनतेचा विश्वासघात असल्याने त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण कुंटे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी जनतेकडे लक्ष देण्याऐवजी राजभवनात चहापान आणि इतर राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. नागपूरच्या जनतेने त्यांना महापौर ते मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचवले. सातत्याने विधानसभेत निवडून दिले. करोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळात त्यांनी एकदाही नागपूरचा दौरा केला नाही वा मतदारसंघातील जनतेला भेटले नाही. गेल्या दोन महिन्यात राज्यातील बहुतांश मंत्री व लोकप्रतिनिधींनी आपला जिल्हा व मतदारसंघात जातीने लक्ष दिले. जनतेचे रक्षण व्हावे, यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी महामारीविरुद्ध लढत आहेत. मात्र, त्यांनी शहराकडे एकदाही बघितले नाही. यातून त्यांच्यातील संवेदना लक्षात येते. जनतेकडे लक्ष देण्याऐवजी राजकारणात व्यस्त असणाऱ्या फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रवीण कुंटे यांनी केली आहे.

…..Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Karnataka: मुलीशी मैत्री केल्याने मुलाची हत्या; हत्येपूर्वी नाक, गुप्तांग कापून मृतदेह नदीत फेकला – karnataka 14 year old boy killed over friendship with girl...

हायलाइट्स:१४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्याहत्येपूर्वी मुलाचे नाक आणि गुप्तांग कापलेमृतदेह भीमा नदीपात्रात फेकलाकर्नाटकातील कलबुर्गीमधील धक्कादायक घटनाकलबुर्गी: मुलीसोबत मैत्री केली म्हणून एका १४ वर्षीय...

SBI Home Loan Interest Rate: कर्ज झालं स्वस्त; भारतीय स्टेट बँकेची ‘या’ ग्राहकांसाठी गृहकर्जावर विशेष सवलत – Sbi Reduce Home Loan Rate For Limited...

हायलाइट्स:'एसबीआय'चे गृहकर्ज दर सिबिलशी संलग्न आहेत. चांगला सिबिल असणाऱ्या ग्राहकांना सवलतीत मिळणार गृहकर्जआज बँकेने व्याजदरात केली ०.७० टक्के कपातमुंबई : तुम्ही जर गृहकर्ज...

'चांदीचे बंगले'.. जगण्याचा संघर्ष

मणिबेली, (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) : नर्मदा बचाव आंदोलनामुळे आणि सोशल मीडियामधून नर्मदेकाठचे हे गाव अनेकांपर्यंत पोहचले आहे. या मणिबेलीला निवडणुकांच्या निमित्ताने...

Recent Comments