Home मुंबई नवी मुंबई फळांचा पुरवठा आजपासून सुरळीत

फळांचा पुरवठा आजपासून सुरळीतम. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवी मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील फळबाजार आज, सोमवारपासून सुरू करण्यास बाजार समिती प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून मुंबई आणि उपनगरात फळांचा पुरवठा पुन्हा सुरू होऊ शकेल.

बाजार सुरू करण्यासाठी बाजार समितीने काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. बाजारात दररोज केवळ २५० गाड्यांना परवानगी देण्यात आली असून त्यात आंब्याच्या १०० गाड्या असतील. फळबाजार सुरू करण्याची मागणी मागच्या दोन-चार दिवसांपासून बाजार समितीमधील फळ व्यापाऱ्यांनी समिती प्रशासनाकडे लावून धरली होती. याबाबतची एक बैठक व्यापारी आणि बाजार समिती घटकांमध्ये पार पडली. त्यात हा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बाजारातील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही नियम नव्याने निश्चित करण्यात आले आहेत. बाजारात फळांच्या २५० गाड्या येऊ शकणार आहेत. त्यात १०० आंब्याच्या, ७० गाड्या संत्री-मोसंबी, द्राक्षाच्या १५, चिकूच्या पाच, पपईच्या १५, अननसाच्या १५, डाळिंबाच्या पाच, टरबुजाच्या १५ तर आयात फळांच्या १० गाड्या असतील. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत येणाऱ्या गाड्यांनाच प्रवेश मिळेल. खरेदीसाठी सकाळी ७ ते दुपारी ३पर्यंतची वेळ आखून देण्यात आली आहे. याच बरोबर निर्यात होणाऱ्या फळांचे पॅकेजिंग बाजार आवारात करण्यावरही बाजार समितीने बंदी घातली आहे. व्यापाऱ्यांना गाळ्यांमध्ये आंबा पिकवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. याच प्रमाणे कलिंगड आणि खरबूज यांचा व्यापार करण्यासाठी बाजार समितीजवळील मोकळ्या मैदानाचा वापर केला जाणार आहे, असे बाजार समिती सचिव अनिल चव्हाण यांनी स्पष्ट केले. बाजारात व्यापार करताना प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे. व्यापारी आणि ग्राहकांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे, असे बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.

किरकोळ विक्री बंद

बाजारातील गर्दी रोखण्यासाठी फळबाजारासह सर्वच बाजारांत किरकोळ विक्री बंद करण्यात आली आहे. बाजारात १५ हजार रु. किमतीपेक्षा कमी मूल्याचा माल खरेदी करता येणार नाही. असे केल्यास हा माल बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जप्त केला जाईल. शिवाय खरेदीदाराला बाजारात प्रवेश करण्यासाठी खरेदीचा पूर्ण तपशील बाजार गेटवर द्यावा लागणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai Indians: IPL 2021: मुंबई इंडियन्सने या अनुभवी खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण यादी – ipl 2021 mumbai indians released lasith malinga...

नवी दिल्ली: IPL 2021 आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणारे तसेच विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाने या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेन आणि रिलीझ...

रिया चक्रवर्ती: वांद्र्यात फुलं विकत घेताना दिसली रिया चक्रवर्ती, यूझर म्हणाले- ‘सुशांतच्या वाढदिवसाचा ड्रामा सुरू झाला’ – rhea chakraborty requested to not follow her

मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर बर्‍याच आरोपांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ती वांद्रे येथे सर्वसामान्यांप्रमाणे...

jalgaon district: ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा; ५ जणांची कारागृहात रवानगी – collector take action against gram sevaks in jalgaon district

म. टा. प्रतिनिधी, जळगावः पदभार सोडूनही ग्रामपंचायतीचे दप्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ८ ग्रामसेवकांना ही दप्तर दिरंगाई चांगलीच महागात पडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी...

Recent Comments