फास्ट


जावयाकडून मारहाण

नाशिक : मद्यधुंद अवस्थेतील जावयाने सासूला मारहाण केल्याची घटना वंजारवाडी येथील मराई मंदिराजवळ घडली. या प्रकरणी सासूने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात जावयाविरोधात मारहणीची फिर्याद दिली आहे. संशयिताने बुधवारी (दि. १३) रात्री दहाच्या सुमारास दारू पिऊन पत्नीस शिवीगाळ केली. त्यामुळे सासूने जावयाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, जावयाने बांबूने सासूला बेदम मारहाण केली.

भाजलेल्या व्यक्तीचा मृत्यू

नाशिक : पेट्रोलची बाटली खाली सांडल्यानंतर सिगारेटमुळे आग लागून गंभीररीत्या भाजलेल्या हेमंत मोरेश्वर सोचे (वय ३५. तलावडी शाळेसमोर) यांचा मृत्यू झाला. हेमंत हे ३ मे रोजी घराजवळ सिगारेट पित असताना पेट्रोलची बाटली खाली पडली. त्यातून लागलेल्या आगीत हेमंत हे २८ टक्के भाजले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी (दि.१५) त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

..

दोन बेवारस मृतदेह

नाशिक : शहरातील अंबड व म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळून आले. पाथर्डी फाटा येथील पुलाखाली शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी अंदाजे ३५ वर्षे वयाचा पुरुषाचा मृतदेह आढळून आला. दिंडोरी रोडवरील हॉटेल रोहित समोरील मोकळ्या जागेत अंदाजे ६५ वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी अंबड व म्हसरूळ पोलिस तपास करीत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

सुशांतसिंह राजपूत बर्थडे: सुशांतसिंह राजपूतच्या बर्थडेला बहिणीने लिहीलं भावुक पत्र, शेअर केले Unseen Photos – sushant singh rajput sister shweta singh kirti posts photos...

मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील चाहते सोशल मीडियावर आपल्या भावना शेअर करत आहेत. कालपासूनच ट्विटरवर त्याचा नावाचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहेत. सुशांतच्या...

coronavirus vaccine india: चीन, पाकलाही करोनावरील लस देणार? ‘ही’ आहे भारताची भूमिका – coronavirus vaccine china pakistan government of india send vaccine to nepal...

नवी दिल्लीः नेबरहुड फर्स्ट पॉलिसीअंतर्गत भारत आपल्या शेजार्‍यांना आणि जवळच्या देशांना करोना लसचा पुरवठा करत आहे. आतापर्यंत कोविशिल्ड लसची ( coronavirus vaccine )...

corona vaccination in mumbai: दैनंदिन लक्ष्य वाढवण्याची गरज – bmc administration demands central government should increase the aims of daily vaccination

मुंबई : लसीकरणाच्या संदर्भात असलेला संभ्रम आणि कोविन अॅपमधील तांत्रिक अडचणी यामुळे लसीकरणाची गती मंद असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. मात्र केंद्र सरकारने...

Recent Comments