Home ताज्या बातम्या फेसबुक वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तातडीनं बदला तुमचा पासवर्ड नाहीतर... | Technology

फेसबुक वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तातडीनं बदला तुमचा पासवर्ड नाहीतर… | Technology


सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वॉलपेपर किंवा गेम्स अॅप्समधून ते तुमच्या मोबाईलमध्ये शिरकाव करतात.

मुंबई, 01 जुलै : जगभरात एकीकडे सर्व नागरिक कोरोनाशी लढत असतानाच आता आणखी एक मोठं संकट ओढवलं आहे ते म्हणजे हॅकिंगचं आणि व्हायरसचं कोरोनासोबतच आता तुमच्या फोन आणि लॅपटॉमध्ये व्हायरसचा हल्ला होण्याची भीती आहे. स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी व्हायरस अ‍ॅप्स एक मोठी समस्या बनली आहे. तुम्ही जर फोनवरून फेसबुक वापरत असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

गुगल प्ले स्टोअरवर संशोधकांनी 25 धोकादायक अँड्रॉइड अ‍ॅप्स असल्याचं सांगितलं आहे. ज्याद्वारे फेसबुकचा पासवर्ड चोरला जाऊ शकतो. त्या अॅपचा मदतीनं फेसबुक हॅक करून गंडा घातला जाऊ शकतो. ही अॅप्स जगभरात 2.3 दशलक्षाहून अधिक वेळा डाऊनलोड केली जात आहे ही सर्वात जास्त चिंतेची बाब असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

हे वाचा- Chinese TikTok नाही तर आता या Indian Apps वर दाखवा आपलं टॅलेंट

सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वॉलपेपर किंवा गेम्स अॅप्समधून ते तुमच्या मोबाईलमध्ये शिरकाव करतात. या छोट्या अॅप्सच्या सहाय्यानं हॅकर्स तुमच्या फोनवर फेसबुकवर नजर ठेवतात.

TikTok असा चोरतो तुमचा डेटा

टिकटॉक (Tiktok) हे प्रत्येकाच्या पसंतीचं अ‍ॅप. आजकाल प्रत्येक जण हे अ‍ॅप वापरत आहे. मात्र आता भारतात या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉक हे चिनी अ‍ॅप आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून टिकटॉकसह 59 चायनीज अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

First Published: Jul 1, 2020 12:27 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

online education of divyang: ऑनलाइन शिक्षणासाठी दिव्यांगांना मोबाइल देणे शक्य नाही; सरकारची भूमिका – not possible to provide mobile for online education of divyang,...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना करोना काळात ऑनलाइन शिक्षण घेता यावे यासाठी एक वेळचा उपाय म्हणून मोबाईल हँडसेट द्यायचे ठरल्यास त्याचा...

pubg mobile global championship 2020: उद्यापासून पबजी चॅम्पियनशीप, १६ टीमचा सहभाग, ८.७८ कोटीचे बक्षीस – view complete details of pubg mobile global championship 2020,...

नवी दिल्लीःPUBG Mobile Global Championship 2020 उद्यापासून सुरू होणार आहे. भारतात पबजीला बंदी असली तरी पबजी लाँचिंगची चाहत्यांना फार उत्सूकता आहे. लवकरच रिलाँच...

Recent Comments