Home शहरं मुंबई 'बर्ड फ्लू' निवारणासाठी स्वच्छता आराखडा

'बर्ड फ्लू' निवारणासाठी स्वच्छता आराखडा


म. टा. विशेष प्रतिनिधी

मुंबई : बर्ड फ्लूच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली असून, उपाययोजनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुंबईत कुठेही मृत कोंबड्या, कावळे, पक्षी आढळून आल्यास नागरिकांनी, कोंबडी विक्रेत्यांनी घाबरून न जाता तत्काळ मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या ‘१९१६’ या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील सर्व चिकन, मटण विक्रेते यांच्या दुकानांची तपासणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, दुकानांसाठी स्वच्छता आराखडा बनवला जात आहे.

मुंबईतही बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आल्याने राज्य सरकार व पालिका प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. चिकन, मटण विक्रेत्यांच्या दुकानांतून संसर्ग पसरण्याची भीती असल्याने सर्व दुकानांची तपासणी होणार असून, स्वच्छतेसाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतची स्वतंत्र कार्यप्रणाली सादर करण्याचे निर्देश प्रशासनाने २४ प्रभागांतील सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार सहाय्यक आयुक्तांनी मंगळवारी सकाळपासून पाहणी मोहीम सुरू करून संबंधितांना मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली.

मुंबईत कुठेही मृत पक्षी, कावळा अथवा कोंबड्या आढळून आल्यास त्यांची चाचणी होईल. हेल्पलाइनवरील तक्रारींच्या निवारणासाठी आपत्कालीन विभाग, संबंधित सहाय्यक आयुक्त कार्यालयात अथवा वॉर्ड वॉर रूममार्फत कार्यवाही होईल. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार केली असून, यात दोन डॉक्टर असतील. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक अभियंत्यामार्फत कर्मचारी आणि कामगार मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावतील. रोगाचा प्रादुर्भाव व प्रसाराबाबत पशुवैद्यकीय विभागाच्या सुचनेनुसार पालिकेच्या आरोग्य विभागाने जनजागृती करावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिल्या आहेत.

विल्हेवाटीसाठी शास्त्रोक्त पद्धत

मृत पक्षी, कावळे, कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी शास्त्रोक्त पद्धत ठरविण्यात आली आहे. मृत पक्षांची विल्हेवाट लावताना जमिनीत खोल खड्डा खोदण्यात यावा. त्या खड्ड्यात त्यांना पुरावे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात चुनखडीचा वापर करण्यात यावा. खड्डा भटक्या प्राण्यांमार्फत उकरला जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘राणीबाग’ला इशारा

राज्य सरकारने भायखळा येथील वीर जिजामाता भोसले प्राणिसंग्रहालयाला सावधानतेचा इशारा दिला आहे. राणीबागेत शेकडो प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत. त्यांना संसर्ग होऊ नये यासाठी राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

येथे साधा संपर्क

पालिकेची हेल्पलाइन १९१६

राज्य सरकारने नियुक्त केलेली रॅपिड रिस्पॉन्स टीम

डॉ. हर्षल भोईर : ९९८७२८०९२१

डॉ. अजय कांबळे : ९९८७४०४३४३

पालिकेची यंत्रणा सज्ज असून, उपाययोजनांसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी संबंधित यंत्रणेला कळवल्यास तत्काळ मृत कोंबडी, पक्ष्यांची विल्हेवाट लावून पुढील कार्यवाही करण्यात येईल. – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त,Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

IPL 2021 Will Chennai Super Kings Retain Suresh Raina – IPL 2021: सुरेश रैनाबाबत CSK घेणार मोठा निर्णय; काय चाललय संघ व्यवस्थापनाच्या मनात… |...

नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी सर्वात खराब झाली होती. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सीएसकेला प्लेऑफमध्ये पोहोचता आले नाही. २०२०च्या आयपीएलचा...

Recent Comments