Home देश बलात्काराचा आरोप: 'भारतीय महिला असं वागत नाहीत', बलात्कार प्रकरणात न्यायालयाची टिप्पणी -...

बलात्काराचा आरोप: ‘भारतीय महिला असं वागत नाहीत’, बलात्कार प्रकरणात न्यायालयाची टिप्पणी – karnataka high court grant bail to accused said falling asleep on being ravished is unbecoming


बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयानं एका कथित बलात्कार प्रकरणात २७ वर्षांच्या आरोपी तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. सोबतच उच्च न्यायालयानं तरुणावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेच्या वर्तणुकीवर टिप्पणीही केली.

‘बलात्कारानंतर थकल्यामुळे तिथेच झोपले’ असं ४२ वर्षीय तक्रारदार महिलेनं आपल्या जबाबात कोर्टासमोर म्हटलं होतं. यावर उच्च न्यायालयानं ‘भारतीय महिला असं करत नाहीत’ अशी टिप्पणी करत आरोपीला जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती कृष्ण एस दीक्षित यांनी या प्रकरणाची सुनावणी केली.

‘तक्रारदार महिलेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं की बलात्कारानंतर ती थकली आणि त्याच ठिकाणी झोपली. एका भारतीय महिलेसाठी हे अशोभनीय वर्तन आहे. एक भारतीय महिला बलात्कारानंतर असं वागत नाही’ अशी प्रतिक्रिया या प्रकरणात उच्च न्यायालयानं दिली.

२ मे रोजी आर आर नगर पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेनं आपल्या कर्मचाऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. गेल्या दोन वर्षांपासून तिच्यासोबत हा कर्मचारी काम करत होता. लग्नाचं आमिष दाखवत त्यानं आपल्यावर बलात्कार केल्याची महिलेनं तक्रार केली होती. आरोपी आपल्यासोबत कारमध्ये बसून कार्यालयात आला. इथं त्यानं आपल्यावर बलात्कार केला, असं महिलेनं म्हटलं. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३७६ (बलात्कार), ४२० (फसवणूक) आणि ५०६ (धमकी देणं) आणि आयटी अॅक्ट २००० च्या ६६ बी च्या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता.

वाचा :पतंजलीने ‘असं’ करायला नको होतं, सरकारने सुनावलं
वाचा :हॉटेल, गेस्ट हाऊसमध्ये चिनी नागरिकांना प्रवेश नाही!

‘बलात्काराच्या दाव्यावर विश्वास ठेवणं कठीण’

स्थानिक न्यायालयानं १९ मे रोजी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आरोपीनं उच्च न्यायालयात दाद मागितली. आरोपीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती कृष्ण एस दीक्षित यांनी, तक्रारकर्त्या महिलेच्या दाव्यानुसार लग्नाच्या खोट्या आणाभाका घेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. परिस्थिती पाहताना या दाव्यावर विश्वास करणं थोडं कठिण आहे, असं म्हटलं.

तक्रारकर्त्या महिलेनं आपल्या तक्रारीत केलेल्या एका वक्तव्याचीही नोंद न्यायालयानं केलीय. यानुसार, एखादी तडजोड केली असता आपण तक्रार परत घेण्यासाठी तयार आहोत असंही तक्रारकर्त्या महिलेनं म्हटलं होतं.

या प्रकरणात प्रतिक्रिया नोंदवताना उच्च न्यायालयानं म्हटलं, ‘तक्रारकर्त्या महिलेनं हे सांगितलेलं नाही की रात्री ११.०० वाजता कार्यालयात काय करत होती? तिनं याचिकाकर्त्यासोबत पेयपान केलं आणि सकाळपर्यंत आपल्यासोबत राहण्यासाठी परवानगी देताना कोणताही आक्षेप घेतला नाही’. सोबतच भारतीय महिलांवर जबरदस्ती केल्यावर त्यांची प्रतिक्रिया अशी नसते, असं म्हणत न्यायलयानं आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

वाचा :काँग्रेस नेत्याने केले मुलींचा अपमान करणारे ट्विट?, भाजपने घेरले
वाचा :करोनाकाळात घटलं सिझेरियन डिलिव्हरीचं प्रमाण!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Thane: Thane: कामाचे पैसे न दिल्याने प्लंबरने केली कंत्राटदाराची हत्या – man killed contractor at ghodbunder in thane

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : कामाचे १२ हजार रुपये न दिल्याने प्लंबरने कंत्राटदाराची हत्या केल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर भागात घडली. हत्येनंतर परराज्यात पळून...

Donald Trumps Filthyair Comment On India, Howdy Modi Trending On Twitter – डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरच्या टिप्पणीनंतर #HowdyModi चा ट्रेन्ड

नवी दिल्ली : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान वारंवार भारताचाही उल्लेख होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणवणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल...

Sharad Pawar: खडसेंना काय मिळणार? पवारांच्या ‘या’ वक्तव्यामुळं सस्पेन्स वाढला! – There Will Be No Change In Maharashtra Cabinet, Says Ncp Chief Sharad Pawar

मुंबई: 'एकनाथ खडसे यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही मंत्र्याचं पद जाणार नाही. मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही. जे जिथे काम करत आहेत, ते...

Recent Comments