Home ताज्या बातम्या बलात्काराची खोटी तक्रार देणाऱ्या महिलेला कोर्टाचा दणका, पुणे जिल्ह्यातील घटना, baramati Court...

बलात्काराची खोटी तक्रार देणाऱ्या महिलेला कोर्टाचा दणका, पुणे जिल्ह्यातील घटना, baramati Court decision on woman who making false allegations of rape | News


याप्रकरणी आरोपीला जामीन तर मिळालाच, पण फिर्यादीवर कडक आणि कठोर कारवाईचे आदेश बारामतीच्या न्यायालयाने पोलिसांना दिले.

इंदापूर, 30 जून : कायद्याचा गैरवापर केल्याच्या घटना अनेकदा पाहायला मिळतात. अशीच एक घटना इंदापूर तालुक्यातही घडली आहे. महिलेने एका व्यक्तीवर बलात्काराचा खोटा आरोप करत तक्रार दिली होती. मात्र आता याप्रकरणी आरोपीला जामीन तर मिळालाच, पण फिर्यादीवर कडक आणि कठोर कारवाईचे आदेश बारामतीच्या न्यायालयाने पोलिसांना दिले.

इंदापूर तालुक्यातील लाकडी येथील एका महिलेने वालचंदनगर पोलीस ठाण्यात आरोपीचे उसने घेतलेले पैसे मिळत नाही म्हणून आरोपीने वारंवार बलात्कार केला, अशी फिर्याद वालचंदनगर पोलिसात दिली. पोलिसात आरोपीविरूध्द गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर पोलीस तपास सुरू झाला.

दरम्यान, आरोपीने बारामतीच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. पोलिसांचा तपास सुरू असताना फिर्यादीने आपल्या जबाबात बलात्कार झालाच नाही असे लेखी जबाबाचे प्रतिज्ञा पत्र दिले आणि या गुन्ह्याला वेगळेच वळण लागले.

आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना या बाबतची फिर्यादीची विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. संबंधीत महिलेने खोटा गुन्हा दाखल करुन पोलीस आणि न्याय व्यवस्थेचा वेळ वाया घालवला म्हणून न्यायालयाने फिर्यादीवर कडक आणि कठोर कारवाईचे आदेश बारामतीचे न्यायधीश आर. आर. राठी यांनी दिले.

First Published: Jun 30, 2020 11:42 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Devendra Fadnavis writes to CM Thackeray: Metro Carshed: मेट्रो कारशेड प्रश्नी फडणवीसांनी केले उद्धव ठाकरेंना सावध – opposition leader devendra fadnavis has written letter...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमेट्रो-३च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी अहवाल तयार करून नवीन समितीचा निव्वळ फार्स करण्यात येत...

Digilocker Service at Central Railway Station: रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वे सुरू करणार ‘डिजीलॉकर’ – central railway has decided to start digilocker service in csmt...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकात डिजीलॉकर सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 'प्रथम...

Recent Comments