Home शहरं औरंगाबाद बाजारपेठांतील गर्दी ओसरली

बाजारपेठांतील गर्दी ओसरली


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करोनाबाधित रुग्णांची संख्या तेराशेच्या घरात पोचली. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी बाजारपेठेत गर्दी काही प्रमाणात ओसरल्याचे चित्र रविवारी (२५ मे) होते. दररोज काही तास बाजारपेठ सुरू राहत असल्याचामुळेही गर्दी कमी झाल्याचे मानले जाते. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह रविवारी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काही दुकाने सुरू होती. दरम्यान, सोमवारी (२५ मे) रमजान ईद असल्यामुळे मुस्लिम बहुल भागांत खरेदीसाठी तुलनेत जास्त गर्दी होती.

‘लॉकडाऊन’ची कठोर अंमलबजावणी संपल्यानंतर सध्या अत्यावश्यक सुविधांची दुकाने सकाळी सात ते एक या कालावधीत सुरू आहेत. रविवारी बाजरपेठांमध्ये तुरळक गर्दी होती. भाजीपाला आणि आंबा खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होती. किराणा दुकांनांसमोरील रांगा कमी होत्या. त्या ठिकाणी सुरक्षित वावरण्याचा नियम काटेकोरपणे पाळला जात नसल्याचे चित्र होते. बहुतांशी नागरिक हे मास्कचा वापर करत आहेत. तोंडाला मास्क वापरत खरेदीसाठी आलेले नागरिक, महिला, तरुण, तरुणी खबरदारी घेत आहेत. शहरातील मोंढा मार्केट, टीव्ही सेंटर, शहागंज, चेलिपुरा, औरंगपुरा भाजी मंडई, गजानन महाराज मंदिर परिसर, गारखेडा, सिडको एन दोन, सिडको-एन पाच, आविष्कार चौक, कामगार चौक, मुकुंदवाडी, सिडको एन-सात अशा विविध बाजारपेठांत खरेदीसाठी सकाळपासून नागरिक आले होते. भाजीपाला, फळे, किराणा साहित्य आदी खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले असले तरी उन्हामुळे नागरिकांचे हाल झाले. बहुतांशी किराणा दुकानांनी, औषधी विक्रेते यांनी सुरक्षित वापरण्याचा नियम पाळण्यासाठी ‘मार्किंग’ केले आहे. काही ठिकाणी त्याचा चांगला उपयोग होतो आहे. काही दुकानांनी आपल्या दुकानांसमोर दोरी बांधून सुरक्षित वावरण्याच्या नियमाचे पालन करण्याचा प्रयत्नही केला. जुना मोंढा भागातही गेल्या काही दिवसांच्या तुलनेत रविवारी गर्दी कमी होती.

सोमवारी रमजान ईद आहे. त्यामुळे प्रशासनाने सवलत दिलेल्या कालावधीत मुस्लिम बहुल भागांमध्ये तुलनेत जास्त गर्दी होती. फळे, भाजीपाला, सुका मेवा, शेवया आदींच्या खरेदीवर नागरिकांचा भर होता.

Bदैनंदिन गरजेच्या सेवांचीही दुकाने उघडलीB

जीवनावश्यक वस्तूंसह इतर काही महत्त्वाच्या आणि दैनंदिन गरजेच्या सेवांचे एखादे-दुसरे दुकाने उघडण्यात आले होते. यामध्ये इलेक्ट्रॉनिक, मोबाइल रिचार्ज, मिक्सर, कुकर दुरुस्तीची आदी दुकानांचा समावेश होता. काही भागात वाहनांच्या चाकांत हवा भरण्यासाठी, पंक्चर काढण्यासाठी गॅरेज सुरू होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sharad pawar on madhukar pichad: Sharad Pawar: गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी ‘या’ नेत्याची काढली पिसं – the behavior of some of...

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी...

Ajinkya raahne: IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला… – ind vs aus : ajinkya rahane given...

नवी दिल्ली, IND vs AUS : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात...

Recent Comments