Home ताज्या बातम्या बापरे! नागपुरात सूर्य ओकतोय आग, आज राज्यात सगळ्यात जास्त रेकॉर्ड तापमान, Nagpur...

बापरे! नागपुरात सूर्य ओकतोय आग, आज राज्यात सगळ्यात जास्त रेकॉर्ड तापमान, Nagpur has the highest temperature recorded in Maharashtra mhak | News


येणाऱ्या दिवसात तापमान आणखी वाढण्याची शकता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलंय.

नागपूर 24 मे : राज्यात विदर्भ सगळ्यात जास्त उष्ण असतो. आणि त्यात उपराजधानी नागपूर सगळ्यात जास्त. नागपूरने आज रेकॉर्ड केला. राज्यात सगळ्यात जास्त तापमान नागपुरात नोंदवण्यात आलं. तब्बल 46.7 डिग्री एवढ्या तापमानाची आज नोंद करण्यात आली. तर शनिवारी 46.5 डिग्री एवढं तापमान होतं. नागपूरमध्ये आज महाराष्ट्रात सर्वात अधिक गरम दिवस राहिला असून येणाऱ्या दिवसात आणखी वाढण्याची शकता  असल्याचा अंदाज वर्तविण्यात आली आहे.

नागपुरात तीन दिवसांपासून चांगलाच उष्मा वाढला आहे. आज नागपूरचे तापमान 46.7 अंश सेल्सिअस होते. या वर्षातील हा उच्चांकी तापमानाचा दिवस ठरला आहे.

गेल्या तीन दिवसापासून नागपूर शहराच्या तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम शहराच्या जनजीवनावर पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्ते थोडेफार सुरू राहत असले, तरी गेल्या तीन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे दुपारी रस्ते सुनसान होत आहेत. नागरिक आपली महत्त्वाची कामे सकाळच्या प्रहरात उरकत आहेत किंवा सायंकाळी चारनंतर घराबाहेर पडण्याला प्राध्यान्य देत आहेत. पुढील आठवड्यातदेखील वातावरण चांगले तापणार असल्याचा इशारा हवामान खात्याचे उपमहासंचालक एम.एल.साहू यांनी दिला आहे. वर्तविला आहे.

असं आहे राज्यातलं कोरोना अपडेट

राज्यात आजही कोरोनाबाधितD रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या भाषणात संख्या वाढणार असल्याचे संकेत दिले होते. संख्या वाढणार असली तरी काळजीचं कारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. राज्यात आज 3041 रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 50 231 एवढी झालीय. तर आज 58 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत 1635 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे राज्यात आत्तापर्यंत 14 हजार 600 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 542वर गेली आहे. त्यामुळे सरकारला चिंता असून ही वाढ रोखण्यावर सरकारने सगळं लक्ष केंद्रीत केलं आहे. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 127 कोरोणा पॉझिटिव्ह  रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 2018 झाली आहे

 

First Published: May 24, 2020 08:50 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

violence at red fort in delhi: tractor rally violence : लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता – violence at...

भिखविंड (तरण तारण) : दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा ( violence at red fort ) लावणारा जुगराज सिंग हा तरुण...

Recent Comments