Home मनोरंजन बारिश सीझन २ : नात्यातले चढ- उतार दाखवणाऱ्या 'बारिश २' चा टीझर...

बारिश सीझन २ : नात्यातले चढ- उतार दाखवणाऱ्या ‘बारिश २’ चा टीझर रिलीज – baarish season 2 teaser released sharman joshi asha negi


मुंबई- झी५ आणि ऑल्ट बालाजी त्यांच्या प्रेक्षकांसाठी बारिश या प्रसिद्ध वेब सीरिजचा पुढचा भाग घेऊन आले आहेत. नुकताच या सीरिजचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. या सीरिजमध्ये अभिनेता शर्मन जोशीने अनूजची व्यक्तिरेखा साकारली आहे तर अभिनेत्री आशा नेगीने गौरवीची भूमिका वठवली आहे.

जेव्हा सासू-सासऱ्यांसाठी सुझानने गायलं गाणं

टीझरमध्ये जोडप्यांचे विचार त्यांच्या भावना आणि मतभेद दाखवण्यात आले आहेत. याशिवाय रोमान्स, इन्टिमसी, मजेशीर क्षण अनुभवताना काळानुरूप जोडप्याच्या गोड नात्यात कटूता येऊ लागते. गोष्टी बदलू लागतात आणि एका कठीण काळातून दोघांना जावं लागतं. या सगळ्यात दोघं घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येतात असे दाखवण्यात आले आहे.


या सगळ्या गदारोळात जीतेंद्र यांची एण्ट्री होते आणि ते नव्याने दोघांना प्रेमात पडायला सांगतात. प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची उर्जा ते देताना दिसतात. अनेक वर्षांनी जीतेंद्र यांना स्क्रीनवर पाहून त्यांचे चाहते आनंदी होतील यात काही शंका नाही.

प्रमोशनसाठी रिक्षांना पोस्टर चिकटवायचा आमिर

नुकतेच या सीरिजचे नवीन पोस्टरही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. एका पोस्टरमध्ये शरमन आणि आशा एकमेकांसोबत आनंदी दिसत आहे. दोघंही मुंबईत पावसाचा आनंद घेताना दिसतात. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरची उदासी स्पष्ट दिसते. याच अनुज (शर्मन जोशी) आणि गौरवी यांच्या आयुष्याचं सार दाखवण्यात आलं असून दोघं नात्याला पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतात.

‘बारिश २’ मध्ये श्रीमंत व्यावसायिक अनुज आणि मध्यम वर्गीय गौरवी यांच्यात नातं टिकवण्यासाठी आणि पुढे वाढवत नेण्यासाठीचे प्रयत्न दाखवण्यात आले आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Municipal Corporation: ‘करोना’शी लढताना पालिकांना आर्थिक चिंता – municipal corporation has need government fund to fight with coronavirus

औरंगाबाद: करोना संसर्गाशी दोन हात करताना महापालिकांना शासनाच्या निधीची गरज आहे, पण राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने निधी देताना हात आखडता घेतला आहे....

Maharashtra cabinet: केंद्राच्या ‘दूजाभावा’वर मंत्रिमंडळाची नाराजी – maharashtra cabinet upset on central government’s financial helps

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकार आर्थिक मदत करीत नसल्यामुळे राज्य सरकारची कोंडी होत असल्याची तक्रार करीत, मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा...

Recent Comments