Home शहरं औरंगाबाद बालविवाह: औरंगाबाद- पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह - police prevent minor girls...

बालविवाह: औरंगाबाद- पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह – police prevent minor girls marriage in aurangabad


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद/वैजापूर

वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील एका सोळा वर्षीय मुलीचा विवाह पोलिसांनी वेगवान हालचाली करून मंगळवारी (३० जून)रोखला. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना विवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती.

करंजगाव येथील एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह वैजापूर तालुक्यातीलच जळगाव येथील मुलासोबत होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि महिला तक्रार निवारण केंद्राचे उपनिरीक्षक अशोक जावळे यांना देऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी करंजगाव येथे जाऊन अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांची भेट घेतली. हे कुटुंब शेतकरी असून ते अशिक्षित असल्याचे समोर आले. त्यांनी अल्पवयीन मुलीचे लग्न नात्यातील व गावाजवळ राहत असलेल्या मुलासोबत करत असल्याचे मान्य केले. निरीक्षक कुलकर्णी आणि उपनिरीक्षक जावळे यांनी त्यांना बालविवाहामुळे मुलीच्या आयुष्यात होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती दिली. तसेच कायदेशीर अडचणी सांगितल्या. या समुपदेशनामुळे मुलीच्या आई-वडिलांनी चूक मान्य करत लग्न करणार नसल्याची ग्वाही दिली. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्यामुळे अल्पवयीन मुलीचा विवाह टळला.

शिक्षेची तरतूद

अल्पवयीन मुलीचे लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असा बालविवाह करणाऱ्यास दोन वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंड, किंवा दोन्ही शिक्षा बालविवाह प्रतिबंध अधिनियम होऊ शकतात.

अल्पवयीन मुलीचा विवाह लवकर करण्याचा घाट न घालता तिला उच्चशिक्षण घेण्यास प्रवृत्त करावे. यामुळे त्या स्वत:च्या पायावर उभे राऊन उज्ज्वल भतितव्य घडवू शकतात. बालविवाह होत असल्याची माहिती कोणाला मिळाल्यास पोलिस, थेट माझ्याशी किंवा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

-मोक्षदा पाटील, पोलिस अधीक्षकSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

raju shetti on farmers republic day parade: दिल्लीत शेतकरी संचलनात घातपाताची शक्यता; ‘या’ नेत्याने व्यक्त केली भीती – raju shetti expressed his fear about...

सांगली: सांगलीतून निघालेला ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर विधान केले...

colonel santosh babu: गलवान खोऱ्यात चिन्यांवर तुटून पडलेल्या कर्नल संतोष बाबूंना महावीर चक्र – gallantry awards galwan valley martyrs colonel santosh babu honoured with...

नवी दिल्लीः पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात ( galwan valley martyrs ) चिनी सैनिकांना अद्दल शिकवताना शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू ( colonel santosh...

Recent Comments