Home शहरं अहमदनगर बाळासाहेब थोरात: नागरिकांच्या बाकीच्या गरजांचे काय : थोरातांचा सवाल - what about...

बाळासाहेब थोरात: नागरिकांच्या बाकीच्या गरजांचे काय : थोरातांचा सवाल – what about the rest of the needs of the citizens balasaheb thorat question


म.टा. प्रतिनिधी, नगर

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केलेल्या राष्ट्र संबोधनात इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य टाळून केवळ गरीब कल्याण योजनेची मुदतवाढ जाहीर केली. असे असले तरी गरिबांना केवळ धान्य वाटप पुरेसे ठरणार नाही. त्यांच्यासह अन्य नागरिकांच्या इतरांचे गरजांचे काय करणार,’ असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.

मंळवारी दुपारी मोदींनी देशाला संबोधित केले. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना हे संबोधन जनतेच्या अपेक्षाभंग करणारे असल्याचे म्हटले आहे. थोरात म्हणाले, ‘ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांकडून पंतप्रधानांच्या राष्ट्र संबोधनाचा उदो उदो करण्यात आला होता, त्यावरून काही तरी मोठी घोषणा आणि दिलासा देणाऱ्या उपाययोजना जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा होती. करोना उपाय योजनांसोबतच ते चीनच्या आगळीकीबद्दलही बोलतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र सर्वांचाच अपेक्षाभंग झाला.

लॉकडाउन सुरू झाल्यापासूनच गरीबांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू आहे. या योजनेची मुदत वाढवावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती. तीच मुदत वाढविण्याचा प्रशासकीय निर्णय जाहीर करण्यासाठी राष्ट्र संबोधनाची गरज नव्हती. कदाचित बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्वत: येऊन ही घोषणा केली असावी. मात्र, गोरगरिबांना अन्नाव्यतिरिक्त इतरही गरजा असतात, त्यांचे काय? याबद्दल पंतप्रधानांनी अवाक्षरही काढले नाही. गरिबांचे घर चालवायचे असेल तर त्यांना रोख मदत देण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे केंद्र सरकारने गरीबांच्या खात्यात प्रति महिना साडेसात हजार रुपये रोख भरावेत.

नोव्हेंबरपर्यंत करोनाचे संकट राहणार आहे, अशी अप्रत्यक्षच कबुलीच पंतप्रधानांनी आज दिलेली आहे. त्यामुळे गरिबांसाहित मध्यमवर्ग, नोकरदार व बेरोजगारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. करोना संदर्भात देश समाधानकारक कामगिरी करत आहे. असे आश्चर्यकारक विधान पंतप्रधानांनी केले. रूग्णसंख्येत जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या पंतप्रधानांकडे करोनाचा प्रदुर्भाव रोखण्याची कोणतीही ठोस उपाययोजना नाही हे आज पुन्हा स्पष्ट झाले आहे. चीनच्या संदर्भात पंतप्रधान ठोस भूमिका घेतील ही देशवासियांची अपेक्षा देखील फोल ठरली आहे.’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bcci: Team India : बीसीसीआयचा मोठा निर्णय, ‘ही’ टेस्ट पास केल्याशिवाय खेळाडूंना संघात प्रवेश नाही – bcci took major decision on indian players fitness...

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारतीय खेळाडूंचा फिटनेस सर्वांनीच पाहिला. भारताचे खेळाडू एकामागून एक दुखापतग्रस्त होत गेले. त्यामुळेच आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय...

Recent Comments