Home ताज्या बातम्या बियाण उगवलं नाही म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या, अमरावतीतील धक्कादायक घटना | News

बियाण उगवलं नाही म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या, अमरावतीतील धक्कादायक घटना | News


अनिल गवई यांच्याकडे 4 एकर शेती आहे. यावर्षी कशीबशी खरीप हंगामाची तयारी करून त्यांनी सोयाबीन व कपाशीची पेरणी केली होती.

अमरावती, 25 जून : राज्यभरात दूरपर्यंत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामातील 60 टक्के पेरण्या आटोपल्या असल्या तरी काही ठिकाणी बियाणे उगविले नसल्यानं शेतकऱ्याचा अडचणीत  वाढ  झाली आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील वसाड येथील अनिल गवई या शेतकऱ्यानं बियाणे न उगवल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील 1 हजार 400 लोकसंख्या असलेल्या वसाड गावात प्रत्येकाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. अनिल गवई यांच्याकडे 4 एकर शेती आहे. यावर्षी कशीबशी खरीप हंगामाची तयारी करून अनिल यांनी सोयाबीन व कपाशीची पेरणी केली होती. मात्र, बियाणे न उगवल्याने ते विवंचनेत असताना त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. अनिल गवई यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने पूर्णपणे कोलमडून गेलेत सुशांतचे वडील

एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कोणतंच पाठबळ देत नाही. कर्जमाफीसुद्धा झाली नाही तर  नवीन कर्जपुरवठा करायला बँका तयार नाही. त्यामुळे शेतकरी आता सावकाराकडे जात आहे. या बोगस बियाणे विकणारा कंपन्यांसोबत कृषी अधिकाऱ्याचं साटंलोटं असताना त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं शेतकऱ्यांचे मत आहे त्यामुळे बोगस बियाणे विकणे सोबत सोबतच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

 संपादन – सचिन साळवे

First Published: Jun 25, 2020 09:18 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

covid 19 vaccine: करोना लसः रजिस्ट्रेशन करताना ‘या’ चुका करू नका – covid 19 vaccine online 5 things to be careful about while registering

हायलाइट्स:करोना लस देशात उपलब्ध असून ती अनेकांनी घेतली आहे लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केली जाणार आहे या लस संबंधी कोणीही काहीही मागितले तर त्यावर...

Kunkeshwar Fair: करोनाचा धसका! श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं साजरी होणार – sindhudurg: kunkeshwar fair of devgad cancelled due to coronavirus

हायलाइट्स:राज्यात करोनानं पुन्हा खाल्ली उचलधार्मिक कार्यक्रम, यात्रांवर निर्बंधकोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्राही रद्दसुरेश कौलगेकर । सिंधुदुर्गदक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र...

Religious Freedom Act: Love Jihad : मध्य प्रदेश विधानसभेत ‘लव्ह जिहाद’विरोधात ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर – mp religious freedom act aims to penalize love jihad...

हायलाइट्स:याआधी, धर्मस्वातंत्र्य अध्यादेशाला राज्यपालांनी दिली होती मंजुरी'लव्ह जिहाद' विरोधात कडक शिक्षेची तरतूद१-१० वर्षांची कैद आणि १ लाखांपर्यंतच्या आर्थिक दंडाची तरतूदभोपाळ : मध्य प्रदेशात...

Recent Comments