बुलेटपाच लाख कर्मचाऱ्यांना औषधे

नाशिकरोड येथील परिवार मित्र मंडळाने कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या १ लाख १० हजार कुटुंबाना होमिओपॅथी औषधांचे वाटप केले आहे. यात प्रामुख्याने पोलिस, सफाई कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी, रेल्वे पोलिस, आशा कर्मचारी, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सुमारे पाच लाख जणांना या औषधांचा लाभ झाला आहे.

करोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जो

महाराष्ट्रात कोविड १९चे संकट गडद होत चालले आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे हे प्रमाण रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने काळजी घेण्याचे आवाहन सातत्याने प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या काळात प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी होमिओपॅथी औषधे सेवन करण्याचेही विविध स्तरांतून सांगण्यात येत आहे. याचा लाभ जनसामान्यांना मिळावा यासाठी परिवार मित्र मंडळ, नाशिकरोड यांच्याकडून या औषधांचे विनामूल्य वाटप करण्यात येत असून, आतापर्यंत १ लाख १० हजार कुटुंबाना हे वाटप करण्यात आले आहे.

करोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. नाशिकच्या मॅकवेल इंडस्ट्री लिमिटेडचे संचालक संजय शाह यांनी समाजात होमिओपॅथी औषधांचे वाटप विनामूल्य करायचे ठरवले. या काळात नाशिकचे होमिओपॅथी डॉ. अनुप गवांदे हे आपल्या स्तरावर होमिओपॅथी औषधांचे विनामूल्य वाटप करत होते. यांची भेट घेऊन आपल्या उपक्रमाबद्दल संजय शाह यांनी माहिती दिली. डॉ. संजय गवांदे यांनी तात्काळ संमती दर्शवली. यानंतर या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात होमिओपॅथी औषधाची गरज निर्माण झाली . डॉ. हर्षदा तळेगावकर, डॉ. अनुप गवांदे व संजय शाह यांनी औषध निर्मिती करण्याचे ठरवत त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याचे ठरवले आणि आनंद नगर येथील संजय शाह यांनी आपली इमारत औषध निर्मितीसाठी दिली व त्या ठिकाणी प्रकल्प निर्मिती सुरू करण्यात आली. औषध निर्मिती शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यास ३ मे पासून सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत १ लाख १० हजार कुटुंबांपर्यंत औषधे पोहचविण्यात आली. याचा फायदा ५ लाख व्यक्तींना झाला आहे.

परिवार मित्र मंडळ, नाशिकरोड या संस्थेने या कार्यात जोडले असून दररोज दहा हजार कुटुंबियांना हे वाटप करण्यात येत आहे. या संस्थेचे पदाधिकारी योगेश थत्ते, भास्कर चितळे, मृत्यूंजय कापसे, केशव सूर्यवंशी, विजय तळेगावकर, मंगेश कुलकर्णी, विलास कुलकर्णी हे कार्यरत आहेत.

यांच्यासाठी प्रामुख्याने वितरण

सफाई कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी, रेल्वे पोलिस, आशा कर्मचारी, एसटी महामंडळ कर्मचारी, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या मागणीवरून नाशिक शहर पोलिस, डीआयसी, नाशिक मध्यवर्ती कारागृह, पुणे येथील कातकरी समाज, महाराष्ट्र राज्य महावितरण त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीणमधील सिन्नर तालुका, नाशिक तालुका, दिंडोरी तालुक्यातील काही भागात मुंबई, ठाणे, दहिसर, वलसाड या भागात मोफत औषधाचे वितरण करण्यात आले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

मराठवाड्याची रुग्णसंख्या पाचशेच्या खाली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांची संख्या सातत्याने घटत आहे. विभागात सोमवारी (२६ ऑक्टोबर) ४३३ नवीन बाधित आढळले. विविध रुग्णालया...

fine to covid norms beaker: ७१ दोषींना ३८ हजारांचा दंड – nashik district court recovered 38000 rupees fine from who break covid 19 norms

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकलॉकडाऊन काळातील नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ७१ दोषी नागरिकांना सोमवारी (दि. २६) कोर्टाने शिक्षा ठोठावली. या नागरिकांकडून ३८ हजार रुपयांचा...

WhatsApp: व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याने ‘त्यांनी’ केला अॅडमिनवर हल्ला – whatsapp group admin attacked by two men after removing member

नागपूर : व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने अॅडमिनवर हल्ला करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चंद्रमणी यादव (५०, सिंधी कॉलनी, वैशालीनगर) आणि छत्रपती...

Recent Comments