Home शहरं पुणे बेकायदा तंबाखूविक्रीकरणाऱ्यांना अटक

बेकायदा तंबाखूविक्रीकरणाऱ्यांना अटकम. टा. प्रतिनिधी, पुणे

किराणा मालाच्या दुकानातून तंबाखूची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई करून विमाननगर आणि येरवडा परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य साठा जप्त करण्यात आला आहे.

मोहनसिंग मनरुपसिंग राजपुरोहित (वय ४६, रा. सोळंकी भवन, वडगाव शेरी) आणि सिराज समी शेख (वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा ) आणि नितीन सत्यनारायण अगरवाल (वय ४३, रा. आझाद चौक, लोहगाव) अशी गुन्हा दखल करण्यात आलेल्या विक्रेत्यांची नावे आहेत.

विमाननगर भागातील किराणा दुकानादार तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, मोहनसिंग जादा दराने तंबाखूची विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून एक लाख ७७ हजार रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. लोहगावमधील गोपी जनरल स्टोअर्समध्ये जादा दराने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकून चार लाख ३३ हजार रुपयांचा माल जप्त केला.

येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये असलेल्या एका बेकरीतून विदेशी सिगारेटची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाला पाठवून बेकरीमध्ये छापा टाकला. त्यावेळी सिराज शेख विदेशी सिगारेटची विक्री करीत असल्याचे दिसून आले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rahul gandhi push up: Rahul Gandhi : राहुल गांधींचे मंचावर पुशअप्स, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल – congress leader rahul gandhi push up with student...

हायलाइट्स:राहुल गांधी तीन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावरविद्यार्थ्यांसोबत स्टेजवर मारले पुशअप्समंचावर विद्यार्थ्यांसोबत घेतला थिरकण्याचा आनंदचेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी...

तोफखाना तज्ज्ञाकडे अरबी समुद्राची जबाबदारी

म. टा. प्रतिनिधी, विनाशिका श्रेणीतील युद्धनौकांच्या तोफांचे तज्ज्ञ असलेल्या अधिकाऱ्यांकडे आता संपूर्ण अरबी समुद्राची जबाबदारी आले आहे. या समुद्राच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पश्चिम...

औरंगाबाद : २८ दिवसांत ८९ वाहने चोरीला

म. टा. प्रतिनिधी, शहरात वर्षभरापासून सुरू झालेल्या वाहनचोरीच्या घटना नित्याच्या झाल्या असून, गेल्या २८ दिवसांमध्ये विविध भागातून तब्बल ८९ वाहने चोरीला गेल्याची माहिती...

Recent Comments