Home ताज्या बातम्या बेदम मारहाणीत चोराने सोडले प्राण, गोदाम मालकासह कामगारांवर खूनाचा गुन्हा दाखल |...

बेदम मारहाणीत चोराने सोडले प्राण, गोदाम मालकासह कामगारांवर खूनाचा गुन्हा दाखल | Crimeमोबाइल चोरटा तावडीत सापडल्यामुळे गोदाम मालक कुशल दोशी आणि कामगारांनी या चोराला बेदम मारहाण केली.

भिवंडी, 18 ऑक्टोबर : भिवंडीमधील परसनाथ कॉम्पलेक्समध्ये एका गोदामात चोरी करण्यासाठी आलेल्या चोराला कामगारांनी मिळून बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोदाम मालकाहस कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील परसनाथ कॉम्प्लेक्स मध्ये ही घटना घडली आहे.  गोदाम मालक कुशल हसमुख दोशी  यांच्या गोदामाचे नुतनीकरणाचे काम  6 कामगार करीत होते.  पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास 3 चोरटे येऊन त्यांनी तेथील कामगारांचे  3 मोबाईल चोरले होते.  याची माहिती मिळताच गोदाम मालक आणि त्यांचे कामगार यांनी चोरट्यांचा शोध घेतला. गोदामापासून काही अंतर दूर गेल्यावर एक चोरटा त्यांच्या हाती लागला. मात्र, दोन चोरटे फरार झाले.

धुळे हादरलं, बेपत्ता असलेल्या 2 वर्षांच्या प्राचीचा विहिरीत आढळला मृतदेह

मोबाइल चोरटा तावडीत सापडल्यामुळे गोदाम मालक कुशल दोशी आणि त्यांच्या कामगारांनी या चोराला बेदम मारहाण केली. या मारहाणी चोर गंभीर जखमी झाला होता. अखेर सकाळी 8 वाजता पोलिसांना जखमी चोर मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी चोरट्याला इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान चोरट्याचा मृत्यू  झाला.

भयंकर! TVमुळे भाऊ झाला वैरी! लहान बहिणीच्या डोक्यात घातला हातोडा

या प्रकरणी गोदाम मालक कुशल दोशी(32) यांच्यासह त्याच्या कामगारांवर हत्येचा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात  दाखल करण्यात आला आहे. तर मृत्यू झालेल्या चोरट्याची ओळख पटली असून त्याचे नाव भरत कनक साई (22) असे असून त्याचे अन्य दोन साथीदार अश्या तिघांवर पोलिसांनी मोबाईल चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


Published by:
sachin Salve


First published:
October 18, 2020, 3:52 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

E Commerce company festive sale: आॅनलाईन शाॅपींग जोरात ; ई-कॉमर्स कंपन्यांची चार दिवसांत २२००० कोटींची विक्री – e commerce festive season sale worth rs...

बेंगळुरू : नवरात्री सोबतच ई-कॉमर्स कंपन्यांचा शॉपींग फेस्टिव्हल सुरु झाला आहे. जास्तीत जास्त सवलती आणि आकर्षक ऑफर्समधून प्रत्येक कंपनी ग्राहकांना भूरळ पडत आहेत....

item remark on woman bjp candidate: ‘आयटम’ का म्हणालात? ४८ तासांत उत्तर द्या, कमलनाथ यांना आयोगाची नोटीस – item remark on woman bjp candidate...

भोपाळ: भाजपच्या महिला उमेदवाराला 'आयटम' म्हटल्याने ( item ) मध्य प्रदेशात राजकारण तापलं आहे. या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने ( election commission...

maharashtra rain: ‘या’ जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह पाऊस; हवामान विभागाचा अंदाज – thunderstorm accompanied with lightning & moderate to intense spells of rain to...

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्याला मुसळधार पावसानं झोडपून काढल्यानंतर आज पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई येथील...

Recent Comments