Home शहरं पुणे बेपत्ता महिलेचामृतदेप सापडला

बेपत्ता महिलेचामृतदेप सापडलाम. टा. वृत्तसेवा, दौंड

टाकळी भीमा (ता. दौंड) येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह भीमा नदी पात्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी शिक्रापूर (ता. शिरूर) येथील करोनाबाधित डॉक्टरकडे महिला तपासणीसाठी गेली असल्याने तिची करोनाची तपासणी केली होती. मात्र, अहवाल निगेटिव्ह आला होता. सुरक्षेच्या दृष्टिने महिलेला ‘क्वारंटाइन’ करण्यात आले होते. या काळात ती गरोदर असल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात तिची प्रसूती करण्यात आली. बुधवारी रात्री महिला कुणालाही न सांगता लहान मुलीला घरी ठेवून निघून गेली. तिच्या भावाने व नातेवाइकांनी परिसरात शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. यामुळे यवत पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. टाकळीचे ग्रामस्थ शुक्रवारी सकाळी परिसरात तिचा शोध घेत असताना भीमा नदी पात्रातील एका काटेरी झुडपात तिचा मृतदेह सापडला. संबंधित महिलेने करोनाच्या धास्तीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, अद्याप तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

०००

दोघांचा बुडून मृत्यू

लोणावळा : पवना नदीवर पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास बेबडओहळ येथे घडली. संतोष उर्फ दादा बाळासाहेब घारे (वय ३२, रा. जवळ, मुळशी) आणि आर्यन दीपक आलम (वय १३, रा. बेबडओहळ, मावळ) अशी पवना नदीत बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. संतोष विवाहित होता. तो दोन दिवसांपूर्वी बेबडओहळ येथील त्याच्या नातेवाइकांकडे आला होता. शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि आर्यन नातेवाइकांसोबत शुक्रवारी सकाळी पवना नदीवर पोहायला गेले होते. पोहताना दोघे पाण्यात बुडाले. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र मंडळाचे आपत्कालीन पथक, ‘एनडीआरएफ’ व पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मंडळाचे अग्निशमन दल यांच्या हाती शुक्रवारी संतोषचा मृतदेह लागला, तर आर्यनचा मृतदेह शनिवारी सकाळी सापडला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

औरंगाबाद : २८ दिवसांत ८९ वाहने चोरीला

म. टा. प्रतिनिधी, शहरात वर्षभरापासून सुरू झालेल्या वाहनचोरीच्या घटना नित्याच्या झाल्या असून, गेल्या २८ दिवसांमध्ये विविध भागातून तब्बल ८९ वाहने चोरीला गेल्याची माहिती...

jee main february exam: जेईई मेन २०२१ फेब्रुवारी परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या – jee main 2021 february exam result will be declared on...

हायलाइट्स:जेईई मेन २०२१ चे पहिले सत्र २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेया परीक्षेचा निकाल ७ मार्च पर्यंत होणार जाहीरजेईई मेन २०२१1...

Mumbai power outage: Nitin Raut: मुंबईतील ‘पॉवर कट’मध्ये चीनचा हात; आज कळणार नेमकं काय घडलं? – mumbai power outage was a likely chinese cyber...

हायलाइट्स:मुंबईतील 'पॉवर कट' हा चीनचा सायबर हल्लाअमेरिकेतील प्रसिद्ध दैनिकाचा एका अहवालाच्या आधारे दावामागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी झाला होता मुंबईतील वीज पुरवठा खंडितमुंबई:...

Recent Comments