Home ताज्या बातम्या बेबी मुव्हमेंटच्या VIDEO मध्ये प्रेग्नंट महिलेला दिसलं असं काही; पाहून तुमच्याही अंगावर...

बेबी मुव्हमेंटच्या VIDEO मध्ये प्रेग्नंट महिलेला दिसलं असं काही; पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल pregnant woman saw shadow in moving baby bump video viral mhpl | Viral


आपण रेकॉर्ड केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर महिलेला घामच फुटला.

वॉशिंग्टन, 02 जुलै : आपल्या प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपायला प्रत्येकाला आवडतं. अशाच पद्धतीने आपल्या पोटातील बाळाची हालचाल टिपण्याचा प्रयत्न एका महिलेनं केला. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला. या व्हिडीओ तिला असं काही दिसलं जे तिथं ना व्हिडीओ शूट करताना होतं, ना तिनं उघड्या डोळ्यानं कधी पाहिलं होतं आणि हा व्हिडीओ पाहून तिला घामच फुटला.

अमेरिकेतील ही प्रेग्नंट महिला घरात एकटी राहत होती. ही महिला आपल्या पोटातील बाळाची हालचाल आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपत होती. त्यावेळी तिची मांजर विचित्र आवाज काढत होती. मात्र महिलेनं त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर या महिलेनं जेव्हा आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलेला हा व्हिडीओ पुन्हा पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला.

या व्हिडीओत आपण पाहू शकतो तिला एक सावली दिसली.  डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतल्या मलाकाई जेम्स या महिलेनं रेडिटवर (Reddit) हा व्हिडीओ टाकला आहे. ही घटना आपल्या छोट्या बहिणीसह घडल्याचं तिनं सांगितलं. आपल्या बहिणीसह एक मांजर आणि एक कुत्रा राहतो.

मलाकाईने सांगितलं, तिची बहीण गरोदर आहे आणि ती बेबी मुव्हमेंटचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करत होती. अचानक तिला मांजरीचा आवाज आला. मांडर एका ठिकाणी पाहून ओरडत होती. जेव्हा तिच्या बहिणीने आजूबाजूला पाहिलं तेव्हा तिला काही दिसलं नाही, मात्र जेव्हा तिनं व्हिडीओ पाहिला तेव्हा ती मोठ्याने ओरडली. या व्हिडीओत तिला एक विचित्र सावली दिसत होती. जी पुन्हा पुन्हा येतजात होती.  हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अनेकांनी त्याच्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

संकलन, संपादन – प्रिया लाड

First Published: Jul 2, 2020 04:59 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Devendra Fadnavis: फडणवीसांनी शब्द पाळला; करोना उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांत दाखल – bjp leader devendra fadnavis tested covid positive admitted to government hospital

मुंबईः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांना पुढील उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांत दाखल करण्यात...

renuka mata temple: देवी तुझ्या भक्तीने तहान, भूक हरली! – navratri 2020, history of renuka mata devi mandir

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्रीफुलंब्री - राजूर रस्त्यावरील रिधोरा येथे रेणुका मातेचे भव्य मंदिर आहे. देवीच्या यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक येतात. मात्र, यंदा करोनामुळे...

railway security force: पळालेली तीन चिमुकली पुन्हा मातेच्या कुशीत – three children found nashik railway station to railway security force after inform his family

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड"वडील जेलमध्ये, धुणीभांडी करणारी आई दिवसभर कामावर.. आम्हाला पोटभर जेवायलाही मिळत नाही..!" या गरिबीला कंटाळून तीन चिमुकली मुले अखेर घरातून...

Recent Comments