Home मनोरंजन बॉलिवूडमध्ये भेदभाव सुरुच; कुणाल खेमू आणि विद्युत जामवालनं व्यक्त केली नाराजी

बॉलिवूडमध्ये भेदभाव सुरुच; कुणाल खेमू आणि विद्युत जामवालनं व्यक्त केली नाराजी


मुंबई :लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे देशभरातली चित्रपटगृहं सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे काही चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ लागलेत. अभिनेता अजय देवगण, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, आलिया भट्ट, कुणाल खेमू, विद्युत जामवाला यांचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार; अशी एक घोषणा नुकतीच करण्यात आली. पण, या घोषणा करताना केवळ अक्षय, अजय, आलिया, अभिषेक, वरुण हेच कलाकार लाइव्ह कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील आणि या दोन मुख्य कलाकारांना या ऑनलाइन घोषणेच्या कार्यक्रमापासून लांब ठेवण्यात आलं. त्यामुळे या दोघांनीही यावरुन नाराजी व्यक्त केली आहे.

बॉलिवूडनं आपले सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी ओटीटीचा वेगळा मार्ग निवडला आहे. अनेक चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. कुणाल खेमूचा ‘लूटकेस’ आणि विद्युत जामवालचा ‘खुदा हाफिज’ हे सिनेमेही लवकरच हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. पण, या चित्रपटांच्या घोषणा करण्यासाठी कुणाल आणि विद्युतला आमंत्रण न पाठवण्यात आल्यानं त्यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे.

‘इज्जत आणि प्रेम हे मागून मिळत नसते, तर ते कमवावे लागते’ अशा आशयाचं ट्विट करत कुणालनं आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच विद्युतनं, ‘खरंच ही खूप मोठी घोषणा आहे. सात चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. पण, दोन चित्रपटांना आमंत्रणच देण्यात आलं नाही’ असं विद्युतनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये नवोदित कलाकारांकडून नाराजीचा सूर ऐकू येतोय. लवकरच ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘दिल बेचारा’, ‘बिग बूल’, ‘सडक – २’, ‘भूज’, ‘खुदा हाफिज’, ‘लूटकेस’ हे चित्रपट प्रेक्षकांना फर्स्ट डे फर्स्ट शो ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Devendra Fadnavis Corona Positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; केलं ‘हे’ आवाहन – opposition leader devendra fadnavis tests positive for covid 19

मुंबई: करोना काळात राज्यभर दौरे करणारे व लोकांना भेडसावणारे प्रश्न राज्य सरकारकडे मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे....

e vehicle may be delay due to corona: करोनाचे संकट; ई-वाहनांना लागणार ब्रेक – e-vehicles will be delayed

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन २०३० पर्यंत संपूर्ण देशात ई-वाहने रस्त्यांवर चालवली जातील, हा केंद्र सरकारचा संकल्प अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट...

Marathwada : २४ तासांत आढळले ५८५ नवे करोनाग्रस्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांच्या संख्या कमी होत असून, गुरुवारी (२३ ऑक्टोबर) विभागाातील आठही जिल्ह्यांत ५८६ नवीन बाधित आढळले...

Recent Comments