Home ताज्या बातम्या भयंकर अपघात: बस आणि गॅस टँकरची जोरदार धडक, 3 जणांचा होरपळून मृत्यू,...

भयंकर अपघात: बस आणि गॅस टँकरची जोरदार धडक, 3 जणांचा होरपळून मृत्यू, dhule accident Bus and gas tanker 3 people died on the spot mhas | News


या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला तर गॅस टँकरमधून महाकाय आगीचे तब्बल 50 फुटापर्यंत लोळ उसळत होते.

धुळे, 18 मे : काळजाचा ठोकाच चुकवेल असा भीषण अपघात नागपूर – सुरत महामार्गावरील मुकटी शिवारातील भिरडाने फाट्याजवळ  झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि गॅस टँकरच्या समोरासमोर झालेल्या धडकेमुळे हा भीषण अपघात झाला असून यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

खासगी ट्रॅव्हल्स बस ही जलगावहून धुळ्याकडे येत होती तर टँकर हा जळगावच्या दिशेने जात होता. त्याचवेळी भरधाव ट्रॅव्हल्स बसने समोरून येणाऱ्या टँकरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की काही क्षणात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात दोन्ही वाहन जळून खाक झाली असून वाहनांची आणि मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

दरम्यान, ट्रॅव्हल्स बस मध्ये नेमके प्रवासी किती होते हे ही अजून स्पष्ट झालेले नाही. या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला तर गॅस टँकरमधून महाकाय आगीचे तब्बल 50 फुटापर्यंत लोळ उसळत होते.

अपघातानंतर होणाऱ्या स्फोटांचा आवाज व आगीचे लोळ एक ते दोन किलोमीटर पर्यंत पाहता येत होते. आगीच्या लोळात दोन्ही वाहने असल्याने जवळपास कुणीही जाऊ शकणार नाही, अशी स्थिती होती. 

संपादन – अक्षय शितोळे

First Published: May 18, 2020 11:01 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

shiv sena vs bjp in bmc: शिवसेनेवरचा ‘हा’ आरोप भाजपला भलताच महागात पडला! – maha vikas aghadi parties hit the bjp over distribution of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या वर्षीच्या विकासनिधीचा शिवसेनेकडून गैरवापर झाल्याचा आरोप भाजपलाच महागात पडला आहे. यंदाच्या विकासनिधी वाटपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि...

maharashtra budget 2021: राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता – maha vikas aghadi government trying to give concession in petrol and...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली असल्याने यातून राज्यातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकार...

Recent Comments