Home ताज्या बातम्या 'भारताची तुलना मुस्लीम राष्ट्राशी केली', मुख्यमंत्र्यांविरोधात औरंगाबादमध्ये पोलिसांत तक्रार police Complaint lodged...

‘भारताची तुलना मुस्लीम राष्ट्राशी केली’, मुख्यमंत्र्यांविरोधात औरंगाबादमध्ये पोलिसांत तक्रार police Complaint lodged against cm Uddhav Thackeray dasara melava speech at aurangabad mhss | Crimeमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात खणखणीत भाषण करत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

सचिन जिरे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 27 ऑक्टोबर : शिवसेनेचे (Shivsena)पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या भाषणामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे, औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार (Police complaint)दाखल करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात खणखणीत भाषण करत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. यावेळी, उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशचा उल्लेख केला होता. त्यामुळे औरंगाबाद येथील अ‍ॅड.रत्नाकर भिमराव चौरे या वकिलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Go Corona Goची घोषणा देणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना झाला कोरोना

‘उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या आपल्या भाषणात माझ्या भारताची तुलना पाकिस्तान आणि बांग्लादेश या दहशतवादी व मुस्लीम राष्ट्राशी करून माझ्या भारताचा अपमान केला आहे, व माझी धार्मिक भावना भडकावली आहे’, असा आरोपच अॅड.रत्नाकर चौरे यांनी केला आहे.

‘उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व त्याग करून खुर्ची संपादीत केली आहे. त्या संदर्भात मी याआधीही आवाज उठवला होता. तरीही त्यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणातून भारत देशाचा अपमान केला असून राष्ट्रीय व धार्मिक भावना दुखावल्या आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई कार्यवाही करावी’, अशी मागणी रत्नाकर चौरे यांनी केली आहे.

रत्नाकर चौरे यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्तालय आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Maratha Reservation:मराठा समाजाला दिलासा नाही, सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलली

दरम्यान, आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून हिंदुत्वाच्या मुद्यावरून सेनेनं भाजपला टोला लगावला आहे.

‘भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व गोमातेच्या भोवती फिरते आहे व त्यातून देशात मोठा खूनखराबा झाला. वीर सावरकरांचे गाईबाबतचे मत वेगळे होते. गाईला ते हिंदुत्वाचे प्रतीक मानायला तयार नव्हते. गाय हा एक उपयुक्त पशू पिंवा प्राणी आहे एवढेच त्यांचे मत, पण भाजपातील हिंदुत्ववाद्यांनी गाईवरून हिंदू-मुसलमानांत दंगली भडकवल्या व राजकारण केले. ‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता? हेच का तुमचे हिंदुत्व? असा टोकदार भालाच उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुपसला आहे. भाजपशासित अनेक राज्यांत गाई कापल्या जातात व खाल्ल्या जातात हे वास्तव आहे. त्यामुळे भाजपचे गाईचे हिंदुत्व तकलादू आहे व  ठाकरे यांनी त्या तकलादू भूमिकेची चिरफाड करत लक्तरे वेशीवर टांगली आहेत’ असंही सेनेनं म्हटलं आहे.


Published by:
sachin Salve


First published:
October 27, 2020, 2:18 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

adult woman free to live with anyone anywhere: ‘प्रौढ तरुणी आपल्या मर्जीने कुठेही आणि कोणाबरोबरही राहण्यास स्वतंत्र’ – adult woman free to live with...

नवी दिल्लीः दिल्ली उच्च न्यायालयाने ( delhi high court ) बुधवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. प्रौढ महिला आपल्या मर्जीने कोणाबरोबरही आणि कुठेही राहण्यास...

‘त्या’ प्रसूतीबाबत पोलिसांनी मागविली कागदपत्रे

म. टा. खास प्रतिनिधी, अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी दाखल होऊनही याबाबत पोलिसांना न कळविल्याने सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन अडचणीत आले आहे. या मुलीवर सामूहिक...

aurangabad News : अन्नातून करोना संसर्ग? ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food; lack of concrete evidence

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: करोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून...

Recent Comments