Home ताज्या बातम्या भारत-नेपाळ सीमेवर पोलिसांकडून गोळीबार; एकाचा मृत्यू, 4 भारतीय नागरिक जखमी bihar one-civilian-killed-and-three-others-injured-in-firing-by-nepal-police...

भारत-नेपाळ सीमेवर पोलिसांकडून गोळीबार; एकाचा मृत्यू, 4 भारतीय नागरिक जखमी bihar one-civilian-killed-and-three-others-injured-in-firing-by-nepal-police mhkk | National


नकाशावरून सध्या भारत आणि नेपाळमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सीतामढ़ी, 12 जून : भारत आणि नेपाळ सीमेवरील तणाव आणखीन वाढताना दिसत आहे. सीमेवर नेपाळच्या पोलिसांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये 4 भारतीय नागरिकांना गोळी लागली असून एकाचा मृत्यू झाला आहे. भारतातील काही भाग हे नेपाळचे असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून केला जात असल्यानं सीमारेषेवर तणावाचं वातावरण आहे.

गोळी लागल्यानं जखमींपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. चारही भारतीय नागरिकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीतामढीच्या जानकीनगर गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार भारत-नेपाळ सीमेवर वाद झाला होता त्यानंतर नेपाळ पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेपासून सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

हे वाचा-कोरोनाच्या संकटात RBIकडून आणखी एका बँकेवर कारवाई, ग्राहकांना पैसे काढण्यास बंदी

नकाशावरून सध्या दोन्ही देशांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे. वाटाघाटीपूर्वी नेपाळला भारताचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे. नेपाळच्या नवीन नकाशामध्ये लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कलापाणी व्यतिरिक्त गुंजी, नाभी आणि काटी या गावांचा समावेश आहे. नेपाळने आपल्या नकाशामध्ये काळापाणीचे 60 चौरस किलोमीटर क्षेत्र स्वतःचे म्हणून घोषित केले आहे. त्याचप्रमाणे नेपाळने 395 चौरस किलोमीटर लिंपियाधूरावर आपला दावा सांगितला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नकाशाला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि नेपाळच्या सीमारेषेवरून पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.

हे वाचा-2 लहान पिल्लांना कुर्‍हाडीने केले ठार, अस्वलीने जे केलं त्यामुळे गाव हादरले

हे वाचा-लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा, जनतेलाही केलं आवाहन

संपादन- क्रांती कानेटकर

First Published: Jun 12, 2020 01:19 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Supreme Court: स्थगिती आदेशाचा चुकीचा अन्वयार्थ – advocates have drawn the attention of the state government and the chief justice over interim stay order

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'कनिष्ठ न्यायालये किंवा उच्च न्यायालयांतील दिवाणी किंवा फौजदारी खटल्यांच्या सुनावणीत देण्यात आलेले अंतरिम स्थगिती आदेश हे कमाल सहा महिन्यांपर्यंतच...

Nashik News : २८ टक्के अहवाल पॉझिटिव्ह, तर ७२ टक्के निगेटिव्ह – nashik corona update : nashik corona recovery rate is 91.66 percent

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी हाच योग्य पर्याय ठरत असून, आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल सव्वातीन लाखांहून अधिक...

Ashok Chavan taunts Narayan Rane: नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर अशोक चव्हाणांची टोलेबाजी – pwd minister ashok chavan taunts bjp mp narayan rane

औरंगाबाद: 'नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर मी अधिका भाष्य करणार नाही. खरंतर त्यांच्या टीकेवर कोणी प्रतिक्रिया देखील दिलेली नाही....

Recent Comments