Home ताज्या बातम्या 'भारत बंदी आणण्यासारखी काही निर्मिती करीत नाही'; चिनी पत्रकाराच्या वक्तव्यावर आनंद महिंद्रांचं...

‘भारत बंदी आणण्यासारखी काही निर्मिती करीत नाही’; चिनी पत्रकाराच्या वक्तव्यावर आनंद महिंद्रांचं चोख प्रत्युत्तर | National


भारताकडून 59 चिनी अॅप्सवर बंदी आणल्यानंतर येथील पत्रकाराने अशा स्वरुपाचं वक्तव्य केलं आहे

नवी दिल्ली, 30 जून : भारत आणि चीन दरम्यान कमांडर-स्तरीय चर्चेच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. यात टिक टॉक आणि यूसी ब्राउझर सारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे.

भारताच्या या कारवाईला सामोरे जात एका चिनी पत्रकाराने सरकारच्या या कारवाईविरूद्ध ट्विट केले. तो म्हणाले की, भारतीय लोक असे काहीच करत नाहीत की ज्यावर आम्ही बहिष्कार घालू शकतो. यावर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटद्वारे त्या पत्रकाराला चोख प्रत्युत्तर दिले.

हे वाचा-‘मराठी’साठी ठाकरे सरकारचं कडक धोरण; कामकाजातील वापरासाठी उचललं हे पाऊल

ग्लोबल टाईम्सचे संपादक आणि चिनी पत्रकार हू झिजिन यांनी ट्विट केले की, “चीनमधील लोकांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची इच्छा आहे, परंतु वस्तुतः भारतीय असे काही करत नाहीत की ज्यावर आपण बहिष्कार घालू शकतो.” भारतीय मित्रांनो, तुम्ही अशी काही कामे करावी जी राष्ट्रवादापेक्षा महत्त्वाच्या आहेत.

यावर आनंद महिंद्रा यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, ‘मला शंका आहे की ही टिप्पणी भारतीय कंपन्यांसाठी आतापर्यंतचे सर्वात प्रभावी आणि प्रेरणादायक वक्तव्य आहे. आपल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!

भारत सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी आणली आहे, यानंतर चिनी सरकारने चिंता व्यक्त केली आहे.

 

संपादन – मीनल गांगुर्डे

 

First Published: Jun 30, 2020 10:02 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

'रिपब्लिक टीव्ही'विरुद्ध हंसा ग्रुपचा नवा दावा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'टीआरपी घोटाळा प्रकरणात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या () दक्षता पथकासोबत काम करून आम्ही अंतर्गत अहवाल तयार करून त्याआधारे मुंबई...

corona free gram panchayat in thane: करोना वेशीबाहेर – 45 gram panchayat of thane district not found single corona positive patient

म. टा. वृत्तसेवा, ठाणेदेशभरात सर्वत्र करोनाच्या संसर्गामुळे चिंतेचे वातावरण असताना ठाण्यातील ४५ ग्रामपंचायमतींमध्ये आत्तापर्यंत एकही करोनारुग्ण आढळलेला नाही. नियमांचे काटेकोर पालन करत वेगवेगळ्या...

gold price today: Gold Rate Today सोने तेजीत ; सलग दुसऱ्या सत्रात सोने दरात वाढ – gold price surge second consecutive day

मुंबई : कमॉडिटी बाजारात बुधवारी सोने आणि चांदीच्या भावात सलग दुसऱ्या सत्रात तेजी दिसून आली. बाजार बंद होताना सोने ३१० रुपयांनी महागले. सोन्याचा...

Recent Comments