Home ताज्या बातम्या मंदिरात जाण्यासाठी हवा होता पास, मोदी म्हणाले..आणि काम झालंच | National

मंदिरात जाण्यासाठी हवा होता पास, मोदी म्हणाले..आणि काम झालंच | National


त्या व्यक्तीला आजन्म मोफत पास देण्याचा निर्णय घेतला आहे

नवी दिल्ली, 2 जुलै : देशात कोरोना कहर सुरूच असल्याने लॉकडाऊन उठवण्यात आला असला तरी रुग्णसंख्या वाढू नये यासाठी नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध लावण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

कर्नाटकातील लेक मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकातील जवळच्या मंदिरात जाण्यासाठी फक्त एक विनामूल्य बस पासची मागणी करीत होते. परंतु गेली अनेक वर्षे त्यांच्या निस्वार्थी कामामुळे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांना आजीवन मोफत पास देण्याचा निर्णय घेतला आहे.

कामगौडा हे काही काळापूर्वीपर्यंत सामान्य माणसासारखे आयुष्य जगत होते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या रेडिओ कार्यक्रम “मन की बात” मध्ये उल्लेख केल्या नंतर त्यांचे जीवन बदलले. तेव्हापासून देशातील लोक त्यांना ओळखू लागले.

हे वाचा-कोरोना रुग्णांना लुबाडणाऱ्या नामांकित रुग्णालयाला BMC चा दणका; FIR दाखल

पीएम मोदींनी कामगौडा संदर्भात आपल्या मन की बातमध्ये म्हटले होते की  वयाच्या 82 व्या वर्षी दसानाडोडीमध्ये 16 तलाव बांधले आहेत. कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील मासवल्ली तालुक्यात दसानडोडी गाव आहे. कामगौडाने पहिला तलाव 40 वर्षांपूर्वी बांधला आणि तेव्हापासून ते कधीही थांबले नाही.

हे वाचा-Coronavirus : कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी अमित शहांचे महामंथन

कामगौडाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे ज्यामध्ये त्यांनी तलावाचे बांधकाम का केले याचा खुलासा केला.

 

First Published: Jul 2, 2020 10:36 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gaya: अनैतिक संबंधांत अडथळा ठरत होता पती, हैवान पत्नीने त्याची… – bihar wife killes husband over illicit affair

गया: बिहारच्या गया येथे एका महिलेने अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या केली. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. महिलेने माहेरच्यांच्या...

अन् अपघाताने बालविवाहाचे पितळ उघडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक लॉकडाउन काळात विवाह सोहळ्याचे आयोजन हे आर्थिक दृष्टिकोनातून वधू पक्षासाठी लाभदायी ठरले. कमीत कमी खर्च आणि नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह...

Recent Comments