Home ताज्या बातम्या मंदिरे उघडताच साईचरणी भरभरून दान, पहिल्याच आठवड्यात 'इतके' कोटी रुपये झाले जमा...

मंदिरे उघडताच साईचरणी भरभरून दान, पहिल्याच आठवड्यात ‘इतके’ कोटी रुपये झाले जमा Shirdi Sai Sansthan has received a donation of Rs 3 crore in a week mhas | News


राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये 16 नोव्‍हेंबरपासून साई मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलं आहे.

शिर्डी, 25 नोव्हेंबर : कोरोना संकटामुळे राज्यभरातील विविध मंदिरे बंद करण्यात आली होती. प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्हणून 17मार्चपासून साई मंदिरही बंद करण्‍यात आले होते. मात्र अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाने राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी जोरदार आंदोलन छेडले. त्यानंतर राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये 16 नोव्‍हेंबरपासून साई मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलं आहे.

16 नोव्‍हेंबर ते 24 नोव्‍हेंबर या नऊ दिवसाच्या कालावधीत सुमारे 48 हजार 224 भक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. आठवडाभरात 3 कोटी 9 लाख 83 हजार 148 रुपये इतकी देणगी संस्थानला प्राप्त‌ झाली आहे. यामध्‍ये दक्षिणापेटीत 1 कोटी 52 लाख 57 हजार 102 रुपये, देणगी काऊंटर 33 लाख 6 हजार 632 रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर आदी रुपये 1 कोटी 22 लाख 50 हजार 822 रुपये आणि 6 देशांचे परकीय चलन अंदाजे रुपये 1 लाख 68 हजार 592 यांचा समावेश आहे. तर 64.500 ग्रॅम सोने आणि 3 किलो 801 ग्रॅम चांदी संस्‍थानला देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झाली आहे.

हेही वाचा राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिला कडक शब्दांमध्ये इशारा

दरम्यान, टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय आणि ऑनलाईन सेवा तसेच‌ सशुल्‍क दर्शन आणि आरती पासेसव्‍दारे 61 लाख 04 हजार 600 रुपये देखील प्राप्‍त झाले आहेत.

या कालावधीमध्‍ये साई प्रसादालयामध्‍ये सुमारे 80 हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला आहे.


Published by:
Akshay Shitole


First published:
November 25, 2020, 9:26 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

leopard couple died in nashik: बिबट्याच्या जोडीचा गोदापात्रात बुडून अंत – leopard couple died due drowning in godavari river

म. टा. वृत्तसेवा, निफाडभक्ष्याच्या शोधात रात्रीची भटकंती करताना गोदावरी नदीपात्रातील गाळामध्ये अडकून पडले त्यातच नाकातोंडात पाणी गेल्याने बिबट्या व व त्याची मादी या...

Ajinkya Rahane: IND vs AUS : भारताच्या विजयानंतर अजिंक्य रहाणे नेमकं काय म्हणाला, पाहा… – ind vs aus : indian captain ajinkya rahane what...

ब्रिस्बेन, IND vs AUS : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजयानंतर अजिंक्यवर जोरदार कौतुक होत आहे. पण...

Recent Comments