Home देश मजुरांचा रेल्वे खर्च: काँग्रेस करणार मजुरांचा तिकीट खर्च, सोनिया गांधींची घोषणा -...

मजुरांचा रेल्वे खर्च: काँग्रेस करणार मजुरांचा तिकीट खर्च, सोनिया गांधींची घोषणा – congress will bear fare of migrant workers going back to their home : sonia gandhi


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देशात विविध भागांत अडकलेल्या मजुरांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आलीय. या ‘श्रमिक स्पेशल’ रेल्वेचा खर्च मात्र मजुरांनीच भरावा, असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. यावर अखिलश यादव यांच्यासहीत अनेकांकडून चांगलीच टीका करण्यात आली. मात्र, आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या गरीब मजुरांच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचं जाहीर केलंय.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी सोशल मीडियावर मजुरांच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचं जाहीर केलं. सोबतच केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

‘परदेशात अडकलेल्या भारतीयांना मोफत मायदेशात आणण्यात आलं पण गरीब कामगारांकडून मात्र तिकीटाचे पैसे वसूल केले जात आहेत. अशावेळी काँग्रेस कमेटीनं प्रत्येक गरजवंत श्रमिक आणि कामगाराचा घरी परतण्याचा रेल्वे खर्च स्वत:हून उचलण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील’ काँग्रेसच्या ट्विटर हॅन्डलरवर जाहीर करण्यात आलेल्या सोनिया गांधींच्या वक्तव्यात म्हटलं गेलंय.

वाचा :असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद; विरोधक मोदी सरकारला घेरलं
वाचा :लखनऊ स्थानकात आनंदोत्सव!
सोनिया गांधींनी काय म्हटलंय आपल्या वक्तव्यात…

‘श्रमिक आणि कामगार हा देशाचा कणा आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यागामुळेच देशाचा पाया रचला गेलाय. केवळ चार तासांच्या नोटीसवर लॉकडाऊन सुरू झाल्यानं लाखो श्रमिक आणि कामगार आपल्या घरी परतू शकले नाहीत. १९४७ च्या विभाजनानंतर देशात पहिल्यांदाच अशी हृदयद्रावक परिस्थिती पाहायला मिळाली, जिथं हजारो श्रमिक आणि कामगारांवर शेकडो किलोमीटर पायीच आपल्या घरी परतण्याची वेळ आली. त्यांच्याकडे ना धान्य, ना पैसा, ना औषध, ना साधनं, पण केवळ आपल्या कुटुंबात परण्याची आस… त्यांची व्यथा विचार करूनच मनाला कापरं भरतं, आणि त्यांचा दृढ निश्चय आणि संकल्प प्रत्येक भारतीयाला कौतुकास्पद वाटतो. पण देशाचं आणि सरकारचं कर्तव्य काय आहे? आजही लाखो श्रमिकांना आणि कामगारांना संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून आपल्या घरी परतायचंय, पण साधनंही नाहीत आणि पैसेही…’ असं म्हणताना सोनिया गांधी यांनी गरीबांबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

‘काँग्रेसनं निशुल्क रेल्वे प्रवासाचा मुद्दा वारंवार उचलला. दुर्भाग्यानं सरकारनं आणि रेल्वे मंत्रालयानं काहीही ऐकलं नाही. यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं हा निर्णय घेतलाय की प्रदेश काँग्रेस समिती प्रत्येक गरजवंत श्रमिक आणि कामगाराच्या घरी परतण्यासाठीचा रेल्वे खर्च उचलणार आहे. यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील. मेहनती लोकांच्या खांद्याला खांदा लावून मानव सेवेच्या या संकल्पात काँग्रेसचं हेच योगदान असेल’, असं त्यांनी जाहीर केलंय.

सोबतच त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केलीय. ‘आपण परदेशात अडकलेल्या भारतीयांना आपलं कर्तव्य समजून विमानं पाठवून निशुल्क परत आणू शकतो, गुजरातच्या केवळ एका कार्यक्रमासाठी सरकारी खजान्यातून १०० करोड रुपये ट्रान्सपोर्ट आणि भोजन इत्यादीवर खर्च करू शकतो, जेव्हा रेल्वे मंत्रालय पंतप्रधानांच्या करोना फंडात १५१ कोटी दान करू शकतात, तर केवळ प्रगतीच्या या ध्वजवाहकांना तुम्ही निशुल्क रेल्वे प्रवासाची सुविधा देऊ शकत नाहीत का?’ असा प्रश्नही सोनिया गांधींनी मोदी सरकारला आणि रेल्वे मंत्रालयाला विचारलाय.

वाचा :भारत नवे गुंतवणूक केंद्र बनेल; राम माधव यांचा विश्वास
वाचा :लॉकडाउन ३.०: पाहा, देशात आज पासून काय सुरू, काय बंद?Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

Recent Comments