Home देश मजुरांना परत आणणार : अडकलेल्या मजुरांसाठी राज्यांच्या हालचालींना वेग, गाड्यांची व्यवस्था करणार...

मजुरांना परत आणणार : अडकलेल्या मजुरांसाठी राज्यांच्या हालचालींना वेग, गाड्यांची व्यवस्था करणार – decision on lockdown to be taken after may 3, says cm uddhav thackeray


नवी दिल्ली : २४ मार्च रोजी घोषित झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनला आता महिना पूर्ण झालाय. दुसऱ्या टप्प्यातील हे लॉकडाऊन ३ मेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, अनेक राज्यांनी इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी संबंधित राज्यांशी चर्चा सुरू केलीय. इतकंच नाही तर अनेक नागरिक आपापल्या राज्यांत परतले आहेत. नांदेडहून तख्त सचखंड श्री हुजूर साहिबच्या दर्शनासाठी गेलेल्या शीख भाविकांचा एक गट रविवारी सकाळी पंजाबला परतला. हे सर्व मार्च महिन्यापासून नांदेडला गेले होते. अचानक लॉकडाऊन सुरू झाल्यानं हे भाविक तिथंच अडकले होते.

वाचा :
३ मेनंतरही सुरू राहणार लॉकडाऊन? तीन राज्यांची मागणी

वाचा :
मोदी म्हणतात, अतिआत्मविश्वासात अडकू नका

महाराष्ट्रात अडकलेले भाविक पंजाबला दाखल

महाराष्ट्र सरकारनं राजस्थान सरकारला आपल्या नागरिकांसाठी सेफ पॅसेज बनवण्याची मागणी केलीय. याच संदर्भात आपण केंद्र सरकारशीही संवाद साधत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. परंतु, अद्याप रेल्वे सेवा सुरू होणार नाहीत. पुन्हा एकदा आम्हाला गर्दी नकोय, अन्यथा लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल, असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

देवळं बंद असली तरी देव आपल्यासोबत: उद्धव ठाकरे

Loading

वाचा :
भारतात करोनाविरुद्धची लढाई ‘पीपल ड्रिव्हन’ – पंतप्रधान मोदी

वाचा :
अपडेट: तुमच्या राज्यात किती करोनाबाधित?

विद्यार्थ्यांसाठी कोटा ते जम्मू-काश्मीर बस

जम्मू-काश्मीरनंही आपल्या नागरिकांना राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जम्मू-काश्मीरचे प्रिन्सिपल सेक्रेटरी (नियोजन) रोहित कन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कोटाहून ३७६ विद्यार्थ्यांना घेऊन बस सुटणार आहे. यासाठी सर्व तयारी झालीय. लोकांनी धैर्य कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलंय.

मजुरांच्या प्रश्नावर राज्यांची चिंता

उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेश सरकारनंही महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून इथल्या लोकांना आपल्या राज्यात परतण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारं पत्र लिहिलंय. छत्तीसगडनंही कोटामध्ये बस धाडून दीड हजार विद्यार्थ्यांना परत बोलावलं आहे. गुजरातमध्ये अडकलेले मध्य प्रदेशचे शेकडो मजूर लॉकडाऊन दरम्यान घरी परतले आहेत. ९८ बसमध्ये जवळपास २४०० मजुरांना घरी पोहचवण्यात आलं. स्क्रिनिंग पार पडल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देशातील इतर भागांतूनही अडकलेल्या लोकांना परत आणलं जाईल, असं आश्वासन दिलंय.

दरम्यान, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत मजुरांच्या प्रश्नावर देशव्यापी निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जातेय.

वाचा :
करोना रुग्ण दुसऱ्यांदा ‘पॉझिटिव्ह’; WHO नं ‘ते’ ट्विट केलं डिलीट

वाचा :
‘१% जनतेसाठी एक कोटी चाचण्यांची गरज’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments