Home शहरं पुणे मजूर, कामगांरांची घरवापसी

मजूर, कामगांरांची घरवापसीम. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे शहरामध्ये आतापर्यंत सुमारे साडेपाच हजार नागरिकांनी मूळ गावी जाण्यासाठी अर्ज केले असले, तरी त्यापैकी फक्त मजूर आणि कामगारांनाच परवानगी मिळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील (पीएमआरडीए) नागरिकांना राज्यातील अन्य जिल्ह्यांत जाण्यास किंवा इतर जिल्ह्यांतून प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी दिली जाणार नाही. मात्र, प्रामुख्याने मजूर आणि कामगारांना परराज्यांत किंवा परजिल्ह्यांत जाण्यास परवानगी दिली जाणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाउनमुळे अडकलेले परराज्यातील आणि परजिल्ह्यांतील मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी आणि अन्य व्यक्तींना मूळ गावी जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ‘पीएमआरडीए’बाबतीत राज्य सरकारने काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत मजूर आणि कामगार वगळता अन्य नागरिकांना परवानगी न देण्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निर्णयानंतर पुणे शहरात अडकलेल्या नागरिकांनी ई-मेल आणि दूरध्वनीवरून माहिती देण्यात सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे साडेपाच हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. मात्र, पुणे शहर हे ‘रेड झोन’मध्ये असल्याने पुण्यातून बाहेर जाण्यासाठी मजूर आणि कामगार वगळता अन्य नागरिकांना परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे या नागरिकांचा मूळ गावी जाण्याच्या मार्ग पुन्हा बंद झाला आहे.

‘पीएमआरडीए’च्या हद्दीतून परराज्य किंवा अन्य जिल्ह्यांत जाणाऱ्या कामगार आणि मजुरांना जवळच्या पोलिस ठाण्यात वैद्यकीय प्रमाणपत्रासह अर्ज करता येणार आहे. सर्व पोलिस ठाण्यांमधील माहिती पोलिस उपायुक्तांकडे पाठविली जाणार आहे. त्या अर्जाची छाननी करून त्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

.

‘पुणे शहरात आतापर्यंत सुमारे साडेपाच हजार नागरिकांनी मूळ गावी जाण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र, पुणे शहर ‘रेड झोन’मध्ये आहे. मजूर वगळता अन्य नागरिकांना बाहेर जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. पराराज्यांतील मजुरांना रेल्वेने पाठवावे लागणार असल्याने मजुरांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतून मजुरांना परराज्य किंवा अन्य जिल्ह्यांत जाण्यास परवानगी मिळणार आहे.’

– तृप्ती कोलते-पाटील, तहसीलदार, पुणे शहर

…………..

निर्णय पोलिस आयुक्तांच्या हाती

‘पुणे शहरातून बाहेर जाण्यास नागरिकांना परवानगी दिली जाणार नसली, तरी वैद्यकीय कारणास्तव पोलिस आयुक्त हे परवानगी देऊ शकतात. त्यासाठी संबंधित नागरिकांना पोलिसांकडे अर्ज करावा लागेल,’ अशी माहिती तहसीलदार कोलते- पाटील यांनी दिली.

…………………..

अधिक माहितीसाठी या ठिकाणी संपर्क साधा

तहसील कार्यालय संपर्क क्रमांक

पुणे शहर ०२०-२४४७२८५०

हवेली ०२०- २४४७२३४८

पिंपरी-चिंचवड ०२०-२७६४२२३३

मावळ ०२११४-२३५४४०

मुळशी ०२०-२२९४३१२१

शिरूर ०२१३८-२२२१४७

भोर ०२११३-२२४७३०

वेल्हा ०२१३०-२२१२२३

पुरंदर ०२११५-२२२३३१

जुन्नर ०२१३२- २२२०४७

आंबेगाव ०२१३३- २४४२१४

खेड ०२१३५- २२२०४०

दौंड ०२११७- २६२३४२

बारामती ०२११२- २२४३८६

………..

अर्ज भरण्यासाठी महत्त्वाचे

– पुण्यातून मूळ गावी जाण्याची परवानगी हवी असल्यास संबंधित नागरिकांना https://covid19.mhpolice.in/ या लिंकवर क्लिक करून माहिती भरावी.

– माहिती भरताना सध्याचा फोटो, फ्लू सदृश आजार नसल्याचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड जोडावे लागणार आहे.

– अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-२६१११०६१ किंवा ०२०-२६१२३३७१ , ई-मेल : dcegspune1@gmail.com

………..

नियोजनासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका

– पुण्यातून परराज्यात जाणाऱ्या स्थलांतरीत कामगारांसाठी संबंधित राज्यांकडून परवानगी घेणे, कामगारांची वैद्यकीय तपासणी झाल्याची खात्री करणे, परवानगी पत्र तयार करून घेणे आणि त्या कामगारांना गावी पाठवण्याची व्यवस्था करणे यासाठीचे अधिकारी : सुभाष भागडे (९४२३०४३०३०), रोहिणी आखाडे (९२२६३७३१९१)

– विद्यार्थी, यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी परवानगी देणे : नीता सावंत (९४२१११८४४६), विवेक जाधव (९४२१२१५६७८)

– परराज्य किंवा परजिल्ह्यांतून पुण्यात येणारे विद्यार्थी, यात्रेकरू आणि पर्यटक यांची वैद्यकीय तपासणी, विलगीकरण व्यवस्था, त्यांना निवासस्थानी पोहोचविण्याची व्यवस्था करणे : अमृत नाटेकर (९८३४४६८८९४/९४२२६१६०३३)

– परजिल्ह्यांतून पुण्यात येणाऱ्या स्थलांतरित कामगारांची वैद्यकीय तपासणी, विलगीकरण, त्यांच्या निवासस्थानी पोहोचविणे : श्रीमंत पाटोळे (९०७५७४८३६१), बालाजी सोमवंशी (८३०८१२७९९२)

– करोनाबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना; तसेच विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक व स्थलांतरित कामगार व अन्य व्यक्तींच्या वैयक्तिक वाहनांना परवाना : संजय पवार (९८५००३२०९५)

– परवान्याबाबत दूरध्वनी किंवा ई-मेलवरून येणाऱ्या तक्रारींचे निरसन : हिंमत खरोड (९४२२०७२५७२)

– विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक, कामगार व अन्य व्यक्ती यांची प्रवास मार्गनिहाय वाहतूक व्यवस्था : संजीव भोर (९४२२२२१११४), विनोद सकरे (८६०५८३७०७०)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus In India: Coronavirus : देशात एका दिवसात १६,८३८ रुग्णांची भर तर १३ लाखांचं लसीकरण – covid 19 cases update in india 16838 new...

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत एकूण १६ हजार ८३८ नवे करोना संक्रमित रुग्ण आढळले२४ तासांत ११३ नागरिकांनी गमावला जीवएकाच दिवशी देशभरात १३ लाख ८८ हजार...

taapsee pannu and anurag kashyap news: ‘कलाकारांची चौकशी करण्याचा अधिकार, पण…’ – sanjay raut on income tax raids on taapsee pannu and anurag kashyap

हायलाइट्स:शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणातापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या चौकशीवरुन राऊतांची टीकाअभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलू नये म्हणून दडपण आणलं जात आहेमुंबईः...

ज्येष्ठ नागरिकास फसविले

म. टा. प्रतिनिधी, मदतीचा बहाणा करून एटीएम कार्डची आदलाबदल करीत भामट्यांनी वृद्धाच्या बँक खात्यातून परस्पर लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे....

Recent Comments