Home शहरं कोल्हापूर मनपाची तारेवरची कसरत

मनपाची तारेवरची कसरतकोल्हापूर : राज्य सरकारने एप्रिल महिन्याचा सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संपूर्ण पगार देण्याचे आदेश शुक्रवारी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. आदेशानुसार आरोग्य व पवडी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी लेखापाल विभागाकडून माहिती संकलित केली जात आहे. दहा मेपर्यंत सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचा प्रयत्न असेल. मात्र त्यासाठी प्रशासनाला एलबीटी व जीसीटीच्या अनुदानाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लॉकडाउनपूर्वी घरफाळा, पाणीपट्टी व अन्य विभागांचा वसूल १५ मार्चपर्यंत सुरू होता. या वसुलीमुळे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात आला. दोन टप्प्यांत पगार देण्याचे निर्देश असले, तरी महापालिकेचे ७० टक्के कर्मचारी त्यासाठी पात्र ठरले नाहीत. परिणामी त्यांचा संपूर्ण पगार द्यावा लागला. केवळ ५५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना एप्रिल अखेर दुसरा टप्पा मिळेल, अशी अपेक्षा होती. पण अद्याप त्यांचा पगार मिळालेला नसतानाच शुक्रवारी सर्वच कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आवश्यक १६ कोटींची रक्कम कशी उभा करायची असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

दर महापालिकेला एलबीटी अनुदानाच्या स्वरुपात ११ कोटी रक्कम मिळते. अनुदानाची रक्कम मिळाली, तरी उर्वरित चार कोटीची रक्कम कशी उभा करायची या विचारात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने प्रथम आरोग्य व पवडी विभागातील कर्मचाऱ्यांचा पगार काढण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर घरफाळा व पाणीपट्टी लॉकडाउनमध्ये जमा करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली सक्षम करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू केले आहेत. मे व जून महिन्यात नियमित घरफाळा जमा करणाऱ्या मिळकतदारांना सूट देण्यासाठी ऑनालइन बिले तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच अधिकाधिक कर जमा होण्यासाठी नव्याने बँकांचा समावेश केला आहे. बिले तयार करुन कर जमा होईपर्यंत काही दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे अनुदानाव्यतीरिक्त उर्वरित रक्कम कशी उभा करायची असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. एकीकडे रक्कम उभा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना एप्रिल महिन्याचा संपूर्ण पगार मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे.

मार्चचा पगार अद्याप बाकी

करोनाचा संसर्ग वाढत गेल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर मोठ्याप्रमाणात निधी खर्च होऊ लागला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ३,५०० कर्मचाऱ्यांचा संपूर्ण पगार दिला आहे. पण अद्याप सुमारे ५५० कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या टप्प्यातील पगार मिळालेला नाही. एप्रिल महिन्याचा सर्व कर्मचाऱ्यांचा पगारे देण्याची सूचना केली असली, तरी त्यामध्ये मागील पगारांबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही.

राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांचे संपूर्ण पगार देण्यात येणार आहे. प्रथम आरोग्य व पवडी विभागातील कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात येईल. सरकारकडून एलबीटीची रक्कम मिळेल. तसेच घरफाळा अधिकाधिक जमा करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली सक्षम करण्यास सुरुवात केली आहे.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

micromax in 1b first flash sale: Micromax In 1b चा पहिला सेल आज, ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्सचा फोन – micromax in 1b...

नवी दिल्लीः भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने जोरदार पुनरागमन केले आहे. नवीन इन सीरीज कंपनीने लाँच केली आहे. या सीरीजमध्ये In Note 1 आणि...

Delhi Chalo Farmers Protest March Live News Updates Photos And Videos – अन्न-पाण्यासहीत शेतकरी आंदोलक दिल्लीच्या सीमेवर दाखल

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं विरोधकांचा विरोध झुगारत देशभरात लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे हजारो शेतकरी 'दिल्ली चलो' आंदोलनात सहभागी झाले...

Petrol price today: Petrol Rate Hike इंधन पुन्हा महागले ; पेट्रोल- डिझेलमध्ये झाली आज दरवाढ – Petrol Diesel Rate Hike Today

मुंबई : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा इंधन दरात वाढ केली. आज गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरात ११ पैसे तर...

Recent Comments