Home मनोरंजन मनमीत ग्रेवाल: आर्थिक संकट आणि डिप्रेशनमुळे अभिनेत्याने केली आत्महत्या - actor manmeet...

मनमीत ग्रेवाल: आर्थिक संकट आणि डिप्रेशनमुळे अभिनेत्याने केली आत्महत्या – actor manmeet grewal commits suicide depression and lockdown


मुंबई- टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवालने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. अनेक मालिकांमध्ये त्याने पंजाबी आणि सिख व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. सब टीव्हीवरील आदत से मजबूर मालिकेत काम करणाऱ्या मनमीतने नैराश्य आणि आर्थिक तंगीमुळे हे पाऊल उचलले असल्याचं म्हटलं जातं. ३२ वर्षीय मनमीत नवी मुंबई येथे राहत होता.

आठ वर्षांपूर्वी मनमीत मुंबईत आलेला. पत्नीसोबत नवी मुंबईतील एका छोट्याशा घरात तो रहायचा. आर्थिक अडचण आणि लॉकडाउनमुळे चित्रीकरण पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे तो नैराश्यात गेला होता. त्याने घरासाठी आणि इतर कामानिमित्त काही कर्ज घेतलं होतं. इतक्या दिवसांमध्ये काम न मिळाल्यामुळे तो नैराश्यात गेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री मनमीतने पत्नीच्या ओढणीने गळ्याला फास बांधत आत्महत्या केली. यानंतर त्याच्या पत्नीने शेजारच्यांकडे मदत मागितली. पण करोना व्हायरसच्या भीतीने कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. यानंतर इमारतीच्या गार्डने मदत केली आणि त्याला इस्पितळात नेण्यात आले. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

वेब सीरिजकडून होत्या अपेक्षा

मनमीत त्याच्या सीख व्यक्तिरेखांसाठी ओळखला जायचा. मालिकांसोबतच त्याने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं होतं. त्याला नुकत्याच एका वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र लॉकडाउनमुळे त्याचं काम अर्ध्यावरच थांबलं होतं. याआधी अभिनेता कुशल पंजाबीने आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचं कारण बेरोजगारी असल्याचं सांगण्यात आलं होतं. प्रत्युषा बनर्जी, जिया खान, नफीसा जोसफ या कलाकारांनीही आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

सुशांतसिंह राजपूत बर्थडे: सुशांतसिंह राजपूतच्या बर्थडेला बहिणीने लिहीलं भावुक पत्र, शेअर केले Unseen Photos – sushant singh rajput sister shweta singh kirti posts photos...

मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील चाहते सोशल मीडियावर आपल्या भावना शेअर करत आहेत. कालपासूनच ट्विटरवर त्याचा नावाचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहेत. सुशांतच्या...

coronavirus vaccine india: चीन, पाकलाही करोनावरील लस देणार? ‘ही’ आहे भारताची भूमिका – coronavirus vaccine china pakistan government of india send vaccine to nepal...

नवी दिल्लीः नेबरहुड फर्स्ट पॉलिसीअंतर्गत भारत आपल्या शेजार्‍यांना आणि जवळच्या देशांना करोना लसचा पुरवठा करत आहे. आतापर्यंत कोविशिल्ड लसची ( coronavirus vaccine )...

corona vaccination in mumbai: दैनंदिन लक्ष्य वाढवण्याची गरज – bmc administration demands central government should increase the aims of daily vaccination

मुंबई : लसीकरणाच्या संदर्भात असलेला संभ्रम आणि कोविन अॅपमधील तांत्रिक अडचणी यामुळे लसीकरणाची गती मंद असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. मात्र केंद्र सरकारने...

Recent Comments