Home ताज्या बातम्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिलं 'हे'...

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर | News


‘मनसेसोबत युती करण्याचा ऑप्शन भाजपनं खुला ठेवला आहे.’

अमरावती, 22 नोव्हेंबर: मुंबई महानगर पालिकेवर (BMC) भाजप (BJP) स्वबळावर कमळ फुलवणार आहे. बाकी निवडणूक जाहीर झाल्यावर बघू. निवडणुकीनंतर मनसेसोबत युती करण्याचा ऑप्शन भाजपनं खुला ठेवला आहे, असे सांगत विरोधी पक्षेनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मनसेसोबत (MNS) युतीचे संकेत दिले होते. मात्र, भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मनसेसोबतच्या युतीचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेणार का? असं विचारलं असता भाजप स्वबळावर लढणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  भारतीय जनता पार्टी (BJP)आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

हेही वाचा…वीज बिल सवलत की पुन्हा लॉकडाउन? मुख्यमंत्री आज करणार मोठी घोषणा

देवेंद्र फडणवीस हे अमरावती शिक्षक मतदरासंघातील भाजप उमेदवार नितीन धांडे यांच्या प्रचारासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मनसेला सोबत घेणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर भाजप आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट करून त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं.

दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेच्या वीज दरवाढीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसेच या आंदोलनात सहभागी होण्याचे संकेतही दिले होते. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेसोबत युती होऊ शकते असं सांगून नव्या राजकीय समीकरणांची चर्चा घडवून आणली होती. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजप-मनसे युतीचं मोठं आव्हान राहणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर दागली टीकेची तोफ

दुसरीकडे, आमच्या नेत्याचा बॅनर फोटो का नाही? असा जाब विचारत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोरच गोंधळ केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली आहे.

महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे. या सरकारचा कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. तर

तीन पक्ष एकमेकाचे नॅचरल अलायन्स नाही. हे नैसर्गिक मित्र नसल्यानं असंच होत राहील, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा…नाशकात कोरोना संसर्ग वाढला! पालकमंत्री छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय

राज्यात उद्या, सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय हा फार गांभीर्याने घेतला गेला पाहिजे. शिक्षकांची कोरोना चाचणी ही राज्य सरकारने आपल्या खर्चाने केली पाहिजे. सोशल डिस्टन पाळलं जात की नाही याचाही विचार केला पाहिजे. कारण पालक फार घाबरलेले आहेत. हा निर्णय सरसकट होऊ शकत नाही, असेही राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत बोलतांना सांगितलं.


Published by:
Sandip Parolekar


First published:
November 22, 2020, 3:46 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

corona infection from food: अन्नातून करोना संसर्ग; ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food but lack of concrete evidence says infectious diseases clinic...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून घरी...

MNS Morcha against Electricity Bills: MNS Morcha Against Inflated Electricity Bill Live Updates – MNS Morcha Live: मनसेचा झटका मोर्चा; राज्यभरात कार्यकर्ते रस्त्यावर

सर्वसामान्य नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलांच्या विरोधात मनसेनं आज मोर्चाचं आयोजन केलं आहे. अनेक शहरांत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी कार्यकर्ते रस्त्यावर...

ed inquiry in private firm in nashik: नाशिकच्या दोन संस्थाची ‘ईडी’कडून चौकशी – enforcement directorate investigation in cooperative organization and private firm over economic...

आर्थिक गैरव्यवहार व व्यवहारांमधील अनियमितता प्रकरणांत मातब्बरांना घाम फोडणाऱ्या 'ईडी'चे (enforcement directorate ) पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे.  Source link

Recent Comments