Home शहरं कोल्हापूर मनीषानगरमध्ये बंगला फोडला

मनीषानगरमध्ये बंगला फोडलाम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एससीसी बोर्ड ते जवाहरनगर रिंगरोडवरील मनीषानगर येथे चोरट्यांनी लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे यांचा बंगला फोडून चोरी केली. डॉ. शिंदे हे पुणे येथे वास्तव्यास असल्याने किती ऐवज चोरीस गेला आहे हे स्पष्ट झाले नाही. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. राजारामपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मनीषानगर येथे शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातून निवृत्त झालेले डॉ. विश्‍वनाथ शिंदे राहतात. सध्या त्यांच्याकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महावीर अध्यासनाचे समन्वयकाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते तेथेच वास्तव्यास आहे. त्यामुळे बंगला बंद होता. चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यांनी बंगल्यातील किमंती वस्तू चोरून नेल्याची शक्यता व्यक्त केली आहे. रविवारी सकाळी त्यांच्या बंगल्याचा दरवाजा शेजाऱ्यांना उघडा दिसला. त्यांनी फोनवरून डॉ. शिंदे यांना चोरीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांना बंगल्यात पाठवल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. नातेवाईकांनी राजारामपुरी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी आले. प्राथमिक चौकशीत चोरट्याने साहित्य विस्कटून त्यातील चांदीच्या मूर्ती, घरगुती गॅस सिलिंडर चोरून नेल्याची माहिती पुढे आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Adesh Bandekar Selected As Brand Ambassador Of Matheran – आदेश बांदेकर बनले माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर; नेमकं काय करणार? | Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधीमहाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची निवड करण्यात आली...

Mira-Bhayandar Municipal Corporation: मीरा-भाईंदर महापालिका अधिकाऱ्यांना हायकोर्टाचा झटका – court asks question to mira-bhayandar municipal officers over delayed the process of making appointments of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमीरा-भाइंदर महापालिकेत चार स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून ती...

Recent Comments