Home संपादकीय मर्यादांचे उल्लंघन

मर्यादांचे उल्लंघन


काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते यांना त्या पदावरून हटवण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी तातडीने घेतल्याचा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. प्रत्येक पक्षाचा पक्षांतर्गत लोकशाही संदर्भातील दृष्टिकोन व्यक्तिसापेक्ष असतो. कोणत्या नेत्याला बोलण्यासाठी कुठपर्यंत मुभा असते, याच्या सीमारेषा अप्रत्यक्षपणे ठरलेल्या असतात. प्रवक्त्याने उच्चारलेला किंवा लिहिलेला प्रत्येक शब्द पक्षाची अधिकृत भूमिका समजली जाते. संजय झा यांच्यासारख्या अनुभवी प्रवक्त्याला त्याची जाणीव नसेल, असे कसे म्हणायचे? कारण ते डेल कार्नेजी प्रशिक्षण कार्यक्रमाचे भारतातील प्रमुख आहेत. ‘प्रोफेशनल काँग्रेस’ या पक्षाच्या एका आघाडीचे महाराष्ट्र प्रमुखही आहेत. पक्षापासून फारकत घेऊन वेगळा रस्ता खुणावू लागला, की अनेकांना पक्षांतर्गत लोकशाहीची आठवण येते. त्यांचेही तसेच झाले असावे. मुंबईस्थित संजय झा यांनी राष्ट्रीय प्रवक्तेपदावर असताना राहुल गांधी यांनी दिलेला पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षाची सद्यस्थिती, पक्षाच्या धोरणांमधील बदलाची गरज आदी मुद्द्यांचा ऊहापोह करणारे लेख लिहिले. पक्षाच्या कार्यशैलीबाबत प्रवक्त्यानेच प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पक्षाला पंडित नेहरूंच्या कृतीची आठवण करून दिली. पंडित नेहरूंनी एकदा स्वत:च्या विरोधात टोपणनावाने लेख लिहून, नेहरू हुकूमशाहीकडे जात असल्याचा इशारा दिला होता. हाच संदर्भ देऊन झा यांनी ट्विट केले. आता त्यांची राजकीय वाटचाल कशी होते, हे कळेलच.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nagpur ZP Election 2021 Latest News: Supreme Court: सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ आदेशाने नागपूरसह ३ ‘झेडपी’त सत्तेचं गणित बदलणार? – re election will be held...

हायलाइट्स:नागपूर, अकोला आणि वाशीम या जिल्हा परिषदांमधील सत्तेचं गणित बिघडणार.नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवरील निवडणुका झाल्या रद्द.सर्वोच्च न्यायालयाने या सर्व जागांवर फेरनिवडणुका घेण्याचे...

bjp vs ncp clash in sangli: BJP vs NCP: सांगलीत भाजप-राष्ट्रवादीचं जीवघेणं राजकारण; ग्रामपंचायतीच्या दारात सदस्याचा बळी – clashes between bjp and ncp in...

हायलाइट्स:उपसरपंच निवडीवरून भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हाणामारीमारहाणीत राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू.कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील धक्कादायक घटना.सांगली:सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे उपसरपंच निवडीच्या वादातून भाजप...

Recent Comments