Home ताज्या बातम्या 'मला क्षमा कर'; चोरीच्या आरोपानंतर करण जोहरनं हात जोडून मागितली माफी |...

‘मला क्षमा कर’; चोरीच्या आरोपानंतर करण जोहरनं हात जोडून मागितली माफी | News


दिग्दर्शक करण जोहरवर (karan johar) चोरीचा आरोप होताच त्यानं माफी मागत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई, 26 नोव्हेंबर : दिग्दर्शक करण जोहरवर (Karan johar) काही दिवसांपूर्वी  चोरीचा आरोप लावण्यात आला होता. दिग्दर्शक मधूर भंडारकरनं हा आरोप केला. मधूर भंडारकरनं (madhur bhandarkar) आपल्या ट्विटवर अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली होती. करण जोहरनं आपलं टायटल चोरल्याचा आरोप त्यानं केला होता. आता करणनं त्याची हात जोडून माफी मागितली आहे आणि याबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे.

दिग्दर्शक करण जोहर आणि निर्माता अपूर्व मेहता (Apoorva Mehta) यांच्यावर मधूर भंडारकरनं शीर्षक चोरीचा आरोप लावला. आपल्या प्रोजेक्टच्या शीर्षकवर या दोघांनी डल्ला मारल्याचं मधूर भंडारकरनं सांगितलं आणि हे टायटल बदलण्यास सांगितलं आहे. आता  करण जोहरनं मधूर भंडारकरला उद्देशून एक ट्वीट केलं आहे, यामध्ये त्यानं एक फोटो जोडला आहे, ज्यामध्ये त्यानं आपल्यावर लावण्यात आलेल्या चोरीच्या आरोपाबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.

करण म्हणाला, “आपलं नातं खूप जुनं आहे, आपण कित्येक वर्षांपासून या इंडस्ट्रीचा भाग आहोत. मला तुझ्या कामाचं नेहमीच कौतुक असतं आणि तुझं चांगलं व्हावं असंच मला वाटतं. मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहेस. गेल्या काही आठवड्यांमध्ये माझ्यामुळे तुला जो त्रास झाला त्यासाठी मी माफी मागतो.

हे वाचा – आमिर खानला हायकोर्टाचा दिलासा,अभिनेत्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली

“मात्र मी स्पष्ट करतो की, आम्ही नवं आणि वेगळं टायटल फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइब्स आपल्या नॉन फिक्शन फ्रेंचाइसचं फॉर्मेट लक्षात ठेवूनच निवडलं होतं. आमचं टायटल हटके होतं. त्यामुळे तू यामुळे नाराज होशील असं मला वाटलं नव्हतं. मी तुझी माफी मागतो. मी तुला सांगू इच्छितो की आम्ही आमच्या सीरिजला फॅब्युलस लाइव्सच्या टायटलनं सोशल मीडियावर प्रमोट करतो आहे. जे एक फ्रेंचाइजचं टाइटल आहे. फॉर्मेट, नेचर, प्रेक्षक आणि सीरिजचं टायटल वेगळं आहे आणि यामुळे तुमच्या प्रोजेक्टला कोणतंही नुकसान होणार नाही, यावर विश्वास ठेव”, असंही करण म्हणाला.

हे वाचा – नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर नाही सावरली आहे ‘या’ अभिनेत्याची पत्नी, म्हणाली…

नेटफ्लिक्सवर नुकतंच बॉलिवूड स्टार्सच्या पत्नींबाबत एक शो तयार करण्यात आला आहे. हा एक वेब रिअॅलिटी शो आहे. ज्याचं नाव Lives Of Bollywood Wives असं आहे. या शोचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. 27 नोव्हेंबरपासून हा शो नेटफ्लिक्सवर येणार आहे. याच शोच्या टायटलवर मधूर भंडारकरनं आक्षेप घेतला आहे. आपल्या टायटलचा वापर केल्यानं त्यानं नाराजी दर्शवली आहे आणि टायटल बदलण्याची मागणी केली आहे.

“करण जोहर आणि अपूर्व मेहता तुम्ही माझ्याकडून वेबसाठी #BollywoodWives टायटल मागितलं होतं, मात्र मी हे टायटल वापरायला नकार दिला होता कारण या टायटलवर माझ्या एका प्रोजेक्टचं काम सुरू आहे. तरी तुम्ही द फेबुलस लाइव्स ऑफ़ बॉलीवुड वाइव्स म्हणून टायटलचा वापर केला, हे चुकीचं आहे. कृपया माझा प्रोजेक्ट उद्ध्वस्त करू नका. तुम्ही टायटल बदलावं असं आवाहन मी करतो”, असं ट्वीट भंडारकरनं केलं होतं.


Published by:
Priya Lad


First published:
November 26, 2020, 10:48 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sharad pawar on madhukar pichad: Sharad Pawar: गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी ‘या’ नेत्याची काढली पिसं – the behavior of some of...

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी...

Ajinkya raahne: IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला… – ind vs aus : ajinkya rahane given...

नवी दिल्ली, IND vs AUS : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात...

Recent Comments