दिवसभरात राज्यात तब्बल 4941 नवे रुग्ण आढळले. ही आतापर्यंत झालेली सर्वाधिक रुग्णवाढ आहे. त्यामुळे Covid-19 चा धोका कमी झालेला नाही, उलट वाढला आहे. पाहा आतापर्यंतचे Corona चे Latest Updates
मुंबई, 25 जून : Coronavirus चं थैमान देशात इतरत्र वाढलेलं असताना महाराष्ट्रासाठी मात्र दिलासादायक बातमी आली आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या विक्रमी होती. दिवसभरात 3661 जणांना घरी सोडलं. राज्याचा Recovery Rate वाढलेला असला, तरी नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या बरीच वाढली आहे. दिवसभरात राज्यात 4941 नवे रुग्ण आढळले. ही आतापर्यंत झालेली सर्वाधिक रुग्णवाढ आहे. त्यामुळे Covid-19 चा धोका कमी झालेला नाही, उलट वाढला आहे.
काल पहिल्यांदाच राज्यात नव्या कोरोनारुग्णांपेक्षा बरं होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी होती.आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्या रुग्णांची संखअया साडेतीन हजारांहून अधिक राहिली. आज एकाच दिवशी 3661 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत 77 हजार 453 रुग्ण बरे झाले आहेत. आजही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक 2844 रुग्ण घरी सोडले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
BIG NEWS : रेल्वेने लॉकडाऊन वाढवला, ‘या’ तारखेपर्यंत गाड्या बंदच राहणार!
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery rate) सुमारे 52 टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 47 हजार 741 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 63,342 आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 52.42 टक्के
मृत्यूदर – 4.69 टक्के
सध्या राज्यात 5,56,428 लोक होम क्वारंटाइन आहेत. 33,952 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला
मुंबईतील रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून आता तब्बल 40 वर दिवसांवर पोहोचला आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच निसर्गाचा भयंकर घाला; वीज पडून 83 जणांचा मृत्यू
रुग्ण वाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन आता 1.81% असा आहे. धारावी, कोळीवाडा इथल्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाच्या साथीवर थोडं नियंत्रण मिळालं आहे. पण अंधेरीसारख्या उच्चभ्रू उपनगरात झपाट्याने कोरोनारुग्ण वाढत आहेत.
संकलन – अरुंधती
First Published: Jun 25, 2020 08:54 PM IST