Home ताज्या बातम्या ‘महाराष्ट्रात भूकंप होणार, सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही’ |...

‘महाराष्ट्रात भूकंप होणार, सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही’ | News


भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर 30 वर्ष एकत्र होते. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे वेगळं नाही.

मुंबई 26 ऑक्टोबर: हिंम्मत असेल तर राज्य सरकार पाडून दाखवा असं थेट आव्हान शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिलं होतं. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले अनेक आमदार नाराज आहे. महाराष्ट्रात एक दिवस नक्कीच भूकंप होणार आहे. सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

आठवले म्हणाले, राज्यातलं सरकार आम्ही पाडणार नाही. आम्ही तसा प्रयत्नही करणार नाही आणि तशी गरजही नाही. आपसातल्या मतभेदांनीच हे सरकार कोसळेल असं भाकितही त्यांनी केलं. सरकार कोसळलं तर अराजक निर्माण होईल या ठाकरे यांच्या वक्तव्या बद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर 30 वर्ष एकत्र होते. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे वेगळं नाही. सगळेच संघाच्या तालमीत तयार झाले आहेत असंही ते म्हणाले.

GSTहा कायदा फसल्याच्या मुख्यमंत्री ठाकरे यांचं वक्तव्य मान्य नाही. जीएसटी फसलेला नाही आणि तो बदलण्याची गरजही नाही असंही ते म्हणाले. कंगना राणौतचं पाकव्याप्त काश्मीरचं वक्तव्य मान्य नाही आणि त्याला आपण पाठिंबा दिलेला नाही असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दसरा मेळाव्यात आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

सरसंघचालक यांनी सांगितलेले हिंदुत्व मानता की नाही? सरसंघचालक सांगतात हिंदुत्व हे पूजेपर्यंत मर्यादित हिंदुत्व नाही, मंदिर उघडे करा म्हणतात. टोप्या नका घालू विनाकारण काहीही सांगून असा निशाणाही त्यांनी भाजपला लगावला.

कंगनाचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा घणाघात, एकेरी उल्लेख करून केली टीका, VIDEO

आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपला टार्गेट केलं. कंगणा राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे असंही ते म्हणाले.

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या तो सगळ्या जगाने पाहिलं असंही ते म्हणाले.

मुंबई, शिवाजी पार्क सगळीकडे चरस गांजा पिकला अस चित्र काही निर्माण केले, आमच्या घरासमोर तुळशीवृंदावन असते. गांजाची शेती तुमच्याकडे असते.

मुंबई महाराष्ट्र पोलिस दल अभिमान आहे. केवळ महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनाम केले जाते.

पाकव्याप्त हे जर देशात असेल तर पीएम यांचे पाप, आमचे पाप नाही. एकाने आत्महत्या केल्यानंतर बिहार पूत्र गेला म्हणून गळे काढले जात आहेत. गळे काढणारे महाराष्ट्र सरकार, ठाकरे कुटुंबीय, आदित्य यावर आरोप केले, गोमूत्र शेणाने गुळण्या केल्या नंतर काय झालं.

अनुराग कश्यपवर #MeTooचा आरोप करणारी अभिनेत्री RPI पक्षात प्रवेश करणार

महाराष्ट्र द्वेष पसरवला जोतोय त्यामुळे सावध रहा. देश तोडण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपा हा मित्रपक्ष पण इमान नका राखू पण किमान मातीशी इमान राखा. अहंकारी राजा आणि कळसु्त्री बाहुल्यांचा खेळ येथे चालणार नाही. कोरोना संकट असताना केवळ पाडापाडी करून सरकार पाडण्याच काम होत असेल तर अराजक वाटचाल आहे.

मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देणार आहोत. त्याची त्यांनी काळजी करू नये. पण त्यावरून राज्यात फुट पाडण्याचं राजकारण यशस्वी होऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं.


Published by:
Ajay Kautikwar


First published:
October 26, 2020, 2:40 PM IST







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

‘त्या’ प्रसूतीबाबत पोलिसांनी मागविली कागदपत्रे

म. टा. खास प्रतिनिधी, अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी दाखल होऊनही याबाबत पोलिसांना न कळविल्याने सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन अडचणीत आले आहे. या मुलीवर सामूहिक...

aurangabad News : अन्नातून करोना संसर्ग? ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food; lack of concrete evidence

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: करोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून...

Recent Comments