Home ताज्या बातम्या महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांविरुद्ध पोलिसांत तक्रार, तहसिलदारालाच केली मारहाण | Crime

महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांविरुद्ध पोलिसांत तक्रार, तहसिलदारालाच केली मारहाण | Crime


वाळूच्या गाड्यांवर केलेला दंड कमी करा, अशी मागणी चंद्रहार पाटील हे मागील काही दिवसांपासून तहसिलदारांकडे करत होते. मात्र,

सांगली, 3 मे: डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी तहसिलदाराला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विटा पोलिसांत चंद्रहार पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

चंद्रहार पाटील यांच्या अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करत विटा येथील तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी साडेसात लाखांचा दंड ठोठावला होता. या वाळूच्या गाड्यांवर केलेला दंड कमी करा, अशी मागणी चंद्रहार पाटील हे मागील काही दिवसांपासून तहसिलदारांकडे करत होते. मात्र, तहसीलदार यांनी सर्व दंड भरावाच लागेल, अशी सूचना दिली होती. याचा राग मनात धरून चंद्रहार पाटील आणि त्यांच्या एका साथीदाराने तहसिल कार्यालयाच्या आवारातच तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना बेदम मारहाण केली. यात तहसीलदारांनी गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी खुद्द तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी विटा पोलीस स्टेशनमध्ये चंद्रहार पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील कारवाई करत आहे.

हेही वाचा.. मद्यपींना खूशखबर! मुंबई-पुण्यासारख्या रेड झोनमध्ये सुरु होतील वाईन शॉप

उपसा, वाहतुकीस बंदी, मग वाळू येते कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात वाळू, मुरुम, दगडाची वाहतूक बेकायदेशीर आहे. परंतू रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक कशी सुरु असते, ही वाळू नेमकी कुठून येते, वाळू वाहतुकीस कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. सध्या वाळूला सोन्याचा दर मिळत आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून सांगलीत वाळू आणली जात आहे. रात्री आणि पहाटे वाळूचे ट्रक आणि डंपर येतात.

हेही वाचा.. कोरोना: डॉक्टरांनी सोडली जगण्याची आशा, 81 वर्षांच्या वडिलांना मुलाने वाचवलं

First Published: May 3, 2020 06:11 PM IST



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rohit Sharma: AUS vs IND: रोहित शर्माच्या जागेवर हक्क सांगणारे तिन्ही फलंदाज पहिल्याच सामन्यात झाले फेल – aus vs ind: lokesh rahul, mayank agarwal...

सिडनी, AUS vs IND: रोहित शर्माने आतापर्यंत भारताला बऱ्याच सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. रोहितच्या दमदार सुरुवातीच्या जोरावर भारताने बरेच सामने जिंकले...

Kangana Ranaut Share Photo With Sanjay Dutt Netizen Trolled Her – संजय दत्तला भेटायला गेली कंगना रणौत, यूझर्स म्हणाले- शेवटी नेपोकिड, चरसीसोबत बसलीस

मुंबई- सध्या कंगना रणौत तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे घरापासून दूर आहे. सध्या ती एकाचवेळी 'थलायवी' आणि 'धाकड' या दोन सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दरम्यान,...

farmers protest on burari nirankari ground: अखेर शेतकऱ्यांना दिल्लीत एन्ट्री, बुराडी मैदानात आंदोलनाची परवानगी – farmer protest delhi burari nirankari ground police permission farm...

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अखेर दिल्लीत एन्ट्री मिळालीय. शुक्रवारी पोलीस आणि आंदोलकांत उडालेल्या धुमश्चक्रीनंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांना...

mumbai news News : NCP: राष्ट्रवादीने आघाडीधर्म पाळला; शिवसेनेच्या विरोधातील ‘त्या’ बंडखोराची हकालपट्टी – candidate who rebelled against shiv sena expelled from ncp

मुंबई: अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणाऱ्या चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर...

Recent Comments