Home ताज्या बातम्या महिंद्रा Electric ची मोठी घोषणा, लवकरच लाँच करणार 3 इलेक्ट्रिक वाहनं! |...

महिंद्रा Electric ची मोठी घोषणा, लवकरच लाँच करणार 3 इलेक्ट्रिक वाहनं! | Auto-and-tech
कंपनीने मागील वर्षी 14,000 पेक्षा जास्त अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली होती.

नवी दिल्ली, 01 जुलै : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन आणि भारत-चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे आयात निर्यातीवर परिणाम झाला आहे. परंतु, तरीही Mahindra Electric कंपनी 2021 मध्ये इलेक्ट्रिक रिक्षा लाँच करण्यावर ठाम आहे. लवकरच 3 नवीन इलेक्ट्रिक वाहनं लाँच करण्यात येणार आहे.

कंपनीने मागील वर्षी 14,000 पेक्षा जास्त अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली होती. Mahindra ची इलेक्ट्रिक वाहन कंपनी या वर्षी eKUV100, Treo Zor आणि Atom लाँच करणार आहे.

कोरोनाच्या काळात  Treo eAuto आणि Treo Yaari eRickshaw ची मागणी पाहता कंपनीने आता लोड कॅरियर, Treo Zor  या वर्षाच्या अखेरीस लाँच करण्याच्या तयारीत आहे.

केंद्राची परवानगी, देशभरात उपलब्ध करणार CORONIL KIT; बाबा रामदेव यांची घोषणा

महिंद्रा इलेक्ट्रिकचे एमडी आणि सीईओ, ‘महेश बाबू  यांनी स्पष्ट केले की,  ई-कॉमर्स कंपन्या आणि डिलेव्हरी करणाऱ्या व्यवसायिकांना इलेक्ट्रिक लोड ऑटोची जास्त प्रमाणात गरज भासत आहे.  इलेक्ट्रिक ऑटोची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. त्यामुळे यावर्षाच्या अखेरीस Treo Zor लाँच करण्याचा आमचा मानस आहे.’

लॉकडाउनमुळे eKUV चे लाँचिंग पुढे ढकलले

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे eKUV ची लाँचिंग पुढे ढकलण्यात आली. मुंबई, चेन्नई आणि दिल्ली सारख्या मोठ्या शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे eKUV लाँच करण्यात आली नाही.

‘… तर मी आत्महत्या करेन’, अभिनेत्रीच्या फेसबुक पोस्टमुळे मनोरंजन विश्वात खळबळ

फेब्रुवारी महिन्यात महिंद्रा अँड महिंद्राचे एमडी आणि सीईओ पवन गोयंका यांनी सीएनबीसी-टीव्ही 18 ला दिलेल्या मुलाखतीत कंपनी महिंद्रा इलेक्ट्रिकमधील हिस्सा विकणार आहे, अशी घोषणा केली होती.

संपादन – सचिन साळवे

Tags:

First Published: Jul 1, 2020 05:47 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

Recent Comments