आपण कोरोनामुक्त झाल्याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली आहे.
मुंबई, 01 जुलै : ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अभिनेत्री मोहिना कुमारी सिंह (Mohena Kumari Singh) आता कोरोनामुक्त झाली आहे. तब्बल एक महिना मोहिनाने कोरोनाशी लढा दिला. अखेर तिचा हा लढा यशस्वी झाला आहे. एक महिनाभर उपचार घेतल्यानंतर मोहिनाचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे.
कोरोनामुक्त झाल्यानंतर मोहिनाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. शिवाय डॉक्टरांचेही तिने आभार मानलेत. मोहिना म्हणाली, अखेर एक महिन्यांनी आम्ही कोरोना नेगेटिव्ह झालोत. आम्ही सर्व एम्स ऋषिकेशचे सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. आज आपण आपल्या देशात डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं सेलिब्रेशन करत आहोत.
“माझ्या आयुष्यात मी खूप चांगले डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भेटले. लोकांच्या वेदना कमी करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं खूप कौतुक वाटतं. हे सर्व डॉक्टर्स प्रत्येकाची अशीत मदत करतील अशी आशा मला आहे आणि तशी प्रार्थना मी करते. लोकांचा डॉक्टरांवर खूप विश्वास असतो. डॉक्टारांनी लोकांची नि:स्वार्थ सेवा करावी, अशी आशा आम्हाला असते. मी अशा सर्व निस्वार्थ, प्रामाणिक, मेहनती डॉक्टरांची आभारी आहे”, असं मोहिना म्हणाली.
हे वाचा – Tiktok वर बंदीनंतर धुळेकर स्टार उद्धवस्त; म्हणाला माझ्या दोन बायका ढसाढसा रडल्या
मोहिना कुमारीसह तिच्या कुटुंबातील 5 सदस्य कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातील तिच्या सासूला थोडासा ताप होता. मात्र त्यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली होती. त्यानंतर सासूचा ताप कमी होत नसल्याने सर्वांनीच कोरोना टेस्ट केली आणि मोहिनाच्या घरातील बहुतेकांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. यानंतर त्यांना ऋषिकेशमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 10 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता मोहिना कोरोनामुक्त झाली आहे.
हे वाचा – रितेश आणि जेनेलिया देशमुख करणार अवयवदान; VIDEO VIRAL
दरम्यान, याधी बॉलीवूडमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वात आधी सिंगर कनिका कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर निर्माता करीम मोरानी आणि त्यांच्या दोन्ही मुली जोआ मोरानी, शाजिया मोरानी कोरोना संक्रमित आढळल्या होत्या. तर किरण कुमार यांनाही व्हायरसची लागण झाली होती. बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर आमिर खानचे स्टाफ मेंबर्सही कोरोनाच्या विळख्यात सापडलेत.
संपादन – प्रिया लाड
First Published: Jul 1, 2020 11:03 PM IST