Home ताज्या बातम्या महिलेला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात सापडला नवरा, पुढे जे घडलं...; पाहा VIDEO | National

महिलेला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात सापडला नवरा, पुढे जे घडलं…; पाहा VIDEO | National


वैतागलेल्या पत्नीने पतीसह त्याच्या प्रेयसीची चांगलीच धुलाई केली.

जयपूर, 21 जून : पत्नीला सोडून विवाहबाह्य संबंध ठेवणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. कारण महिलेने आपल्या पतीला त्याच्या गर्लफेंडसोबत रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर वैतागलेल्या पत्नीने पतीसह त्याच्या प्रेयसीची चांगलीच धुलाई केली. राजस्थानच्या बारां शहर येथील हा सर्व प्रकार आहे.

सदर महिलेच्या पतीने काही दिवसांपूर्वी महिलेसह तिच्या दोन मुलींना घरातून बाहेर काढलं होतं. तसंच तो आपल्या प्रेयसीसह तिथं राहत होता. तर पीडित पत्नी गेल्या दोन वर्षांपासून न्याय मागत वणवण फिरत होती. मात्र कुठेच न्याय मिळत नसल्याने अखेर पीडित महिलेने आपल्या नातेवाईकांसह पतीच्या घरी धडक दिली.

महिला घरी पोहोचल्यानंतर तिने सर्वात आधी धोका देणाऱ्या आपल्या पतीची धुलाई करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच ती थांबली नाही, तर तिने पतीसोबत राहत असलेल्या त्याच्या प्रेयसीलाही झोडपून काढलं.

प्रेयसीला केली जबर मारहाण

पीडित महिलेच्या पतीने प्रेयसीला शहरातील दुसऱ्या ठिकाणी एक घर घेऊन दिलं होतं. तिथं जाऊन तो प्रेयसीसोबत रंग उधळत होता, असा पीडेतेचा आरोप आहे. याबाबत माहिती मिळताच पीडित महिलेने तिथं जात प्रेयसीवर चांगलाच राग काढला.

दरम्यान, पीडित महिलेचं 2006 साली लग्न झालं होतं. दोन मुली झाल्यानंतर पतीने तिला सोडून प्रेयसीसोबत संसार थाटला होता.

First Published: Jun 21, 2020 12:21 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

बुद्धिवान कलांवत :श्रीकांत मोघे

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अल्याड-पल्याड ज्या कलावंतांनी सांस्कृतिक महाराष्ट्र घडवला, मध्यमवर्गीयांच्या अभिरुचीला आकार दिला, त्या लेखक-दिग्दर्शक-कलावंतांच्या मांदियाळीतील एक अस्सल मोहरा म्हणजे . शहरी-ग्रामीण दोन्ही...

maharashtra budget 2021: राज्यासमोर आर्थिक संकट; ठाकरे सरकारपुढे आव्हान – maharashtra budget session 2021 : ajit pawar will submits the budget in the assembly

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना संसर्गाची धास्ती आणि टाळेबंदीमुळे गेले वर्षभर सामान्यांची घडी विस्कटली असून त्याचा परिणाम म्हणून राज्याचा महसूल घटला आहे....

Recent Comments