Home देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंह : एक टक्के जनतेसाठी एक कोटी चाचण्यांची गरज...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह : एक टक्के जनतेसाठी एक कोटी चाचण्यांची गरज : काँग्रेस – coronavirus manmohan singh said aggrasive tesing needed in fight with covid 19 congress said we have to do atleast one crore testing


नवी दिल्ली : करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशात उद्भवलेली परिस्थितीच्या अनुषंगाने काँग्रेसकडून मोदी सरकारला काही उपाय सूचवले जात आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका ऑनलाईन पत्रकार परिषदेद्वारे पत्रकारांशी संवादही साधला होता. आता काँग्रेसनं आपल्या काही नेत्यांकडून करण्यात आलेल्या सूचनांचा एक व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे नागरिकांसोबत शेअर केलाय. या व्हिडिओद्वारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आक्रमक चाचणी सुविधेद्वारे भारत कोविड १९ मुळे उद्भवलेल्या आव्हानांना तोंड देऊ शकतो. चाचणी आणि संक्रमितांना शोधून काढणं या गोष्टी या समस्येशी लढताना महत्त्वाची भूमिका निभावतील.

‘एक कोटी चाचण्यांची गरज’

‘पुरेशा प्रमाणात तपासणी सुविधा नसल्यानं काही समस्या आहेत. तपासणीच्या अधिक आक्रमक सुविधांशिवाय या समस्येतून आपण बाहेर पडणार नाही’ असं माजी पंतप्रधानांनी म्हटलंय. तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लोकसंख्या लक्षात घेतली तर एक टक्के लोकांची तपासण्यासाठी आपल्याला जवळपास एक कोटी लोकांची तपासणी करायला हवी.

या व्हिडिओमध्ये मनमोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बनलेल्या सल्लागार समूहात सहभागी असलेले सदस्य नेते दिसत आहेत. या व्हिडिओत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राहुल गांधी, पी. चिंदबरम, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, महासचिव के सी वेणुगोपाल, पक्षाचे प्रवक्ते मनिष तिवारी असे अनेक नेते दिसत आहेत. या व्हिडिओत त्यांनी प्रवासी मजुरांसंबंधी मानवता, संरक्षण आणि आर्थिक सुरक्षेच्या विषयावरही जोर दिलाय. चर्चा आणि संवादाद्वारे समस्येतून मार्ग काढता येऊ शकतो, असंही काँग्रेसनं या व्हिडिओत म्हटलंय.

‘दोन राज्यांचा संवाद असायला हवा’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, प्रवासी मजुरांच्या संरक्षणासाठी पक्षाकडे एक विस्तृत रुपरेषा असणं आवश्यक आहे. परंतु, आपल्याला हेदेखील स्वीकार करावं लागेल की याच्या अंमलबजावणीसाठी खरी जबाबदारी राज्य सरकारांची असेल. वेगवेगळी राज्य सरकार या समस्येला सोडवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यपद्धतीचा अवलंब करू शकतात. प्रवासी मजुरांचं स्थलांतर दोन राज्यांशी संबंधित असायला हवं, या दोन राज्यांनीच एकमेकांशी संवाद साधायला हवा, असं म्हटलं आहे. प्रवासी मजूर ज्या राज्यांतून आले असतील हे त्याच राज्यांवर सोडायला हवं, की त्यांनी आपल्या कामगारांना दुसऱ्या राज्यातून कसं बाहेर काढावं… असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Maharashtra minister: धान खरेदी केंद्र वाढवा – maharashtra minister chhagan bhujbal has directed increase number of grain shopping centre to administration

म. टा. प्रतिनिधी, मुंबई विदर्भात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली....

PMJJY available in Postal Payment bank: PMJJY जीवन ज्योती योजना; पोस्ट पेमेंट बँकेतही मिळणार जीवन ज्योती विमा – jeevan jyoti yojana now available in...

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्येही (आयपीपीबी) आता पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आयपीपीबीने पीएनबी मेटलाइफ...

father and son found dead in apegaon paithan: बिबट्या जाळ्यात येईना; तीन जिल्ह्यात दहशत – father and son found dead in apegaon paithan due...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादबिबट्याने केलेल्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील आपेगाव शिवारात घडल्यानंतर या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पैठण परिसरातील...

Recent Comments