Home ताज्या बातम्या 'माझ्या समाजाची आणि कुटुंबाची बदनामी करू नका' संजय राठोड अखेर बोलले |...

‘माझ्या समाजाची आणि कुटुंबाची बदनामी करू नका’ संजय राठोड अखेर बोलले | News


पूजा चव्हाण प्रकरणी गेल्या १५ दिवसांपासून गायब असलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड अखेर समोर आले आहे.

वाशिम, 23 फेब्रुवारी : पूजा चव्हाण प्रकरणी गेल्या १५ दिवसांपासून गायब असलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड अखेर समोर आले आहे. ‘पूजा चव्हाण प्रकरणी राज्यात अत्यंत घाणरेडे राजकारण करण्यात आले आहे. माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. माझ्या समाजाची आणि कुटुंबाची बदनामी करू नका’ अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिली.

संजय राठोड यांनी  पोहरादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड यांनी आपली भूमिका मांडली.

‘पूजा चव्हाण ही बंजारा समाजाची मुलगी होती. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झाले आहे. आम्ही सगळे चव्हाण कुटुंबाच्या दुखात सहभागी आहोत. या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत घाणरेडे राजकारण करण्यात आले आहे. मी गेल्या ३० वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय आयुष्यात आहे, माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार पाहण्यास मिळाला आहे. प्रसारमाध्यमातून जे काही दाखवण्यात आले होते. त्यामध्ये काहीही तथ्य नाही’, असा खुलासा राठोड यांनी केला.

‘या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. पोलीस चौकशी सुरू आहे. जे काही चौकशीतून जे काही सत्य समोर येईल, ते सर्वांनी पाहावे’, असंही राठोड म्हणाले.

‘मी काही १५ दिवस कुठेही गेलो नव्हतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, आई वडील वृद्ध आहे. त्यांच्यासोबत १० दिवस होतो. या काळात मी त्यांच्यासोबत होतो. १० दिवस शासकीय बंगल्यावरून काम पाहिले. अमोल राठोड कोण आहे, हे मला माहिती नाही. माझ्यासोबत सर्वच जण फोटो काढत असतात. पण, एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका’, असंही संजय राठोड म्हणाले.


Published by:
sachin Salve


First published:
February 23, 2021, 2:11 PM IST

Tags:







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jalyukt shivar latest news: Jalyukt Shivar Probe: ‘जलयुक्त शिवार’ची माहिती कोण लपवतंय?; ‘या’ जिल्ह्यात अधिकाऱ्यांची झाडाझडती – jalyukt shivar inquiry committee warned the officers

हायलाइट्स:फडणवीसांच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीला वेग.चौकशी समिती नगर जिल्ह्यात घेत आहे कामांची माहिती.प्रशासनातील अनागोंदी समोर आल्याने समिती अध्यक्ष संतापले.नगर:देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...

new farm laws: farm laws : निवडणुकांमधून जनतेचे नवीन कृषी कायद्यांवर शिक्कामोर्तब, भाजपचा दावा – people support new farm laws in elections says prakash...

नवी दिल्लीः गुजरातमधील महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. नव्या कृषी कायद्यांना ( new farm laws ) शेतकरी आणि...

Recent Comments