Home मनोरंजन माधवी निमकर योग: मराठी अभिनेत्रीला लागलं कठीण आसनाचं व्यसन! - actress madhavi...

माधवी निमकर योग: मराठी अभिनेत्रीला लागलं कठीण आसनाचं व्यसन! – actress madhavi nimkar yoga poses and her passion for yoga see her photos


मुंबई- सध्या लॉकडाउनमध्ये प्रत्येकजण घरात आहे. अनेकांना सकाळी फिरायला जायची किंवा जिमला जायची सवय असते पण या सगळ्यात बाहेर पडण्यावर बंदी घातल्यामुळे घरच्या घरीच व्यायाम करावे लागत आहेत. अनेक सेलिब्रिटी त्यांचे वर्कआउटचे आणि योगासनाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांनाही फिट राहण्याचं आवाहन करत आहेत. अशात अभिनेत्री माधवी निमकरच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर तिला योगाचं व्यसन लागल्याचंच दिसतं.

नागपुरात कटिंग चहा घेत खुललं सोनू आणि सोनालीचं प्रेम

अनेक वर्षांपासून माधवी नियमितपणे योगाभ्यास करत आहे. अशात आता ती योगासनांमध्ये प्रविण झाली आहे. याचमुळे एक पाऊल पुढे टाकत तिने कठीण आसणं करण्याचा निश्चय केला. सर्व सामान्यांना अवाक करणारी ती आसनं करते आणि त्याचा फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचे हे फोटो पाहून ‘कसं काय केलं’ असाच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतो. नुकताच तिने एक योगासनाचा फोटो पोस्ट केला.


या फोटोवर अनेकांच्या कमेन्ट आल्या असून सगळ्यांनी तिला हे कसं केलं अशाच धाटणीचा प्रश्न विचारला. अवघड आणि तेवढीच भन्नाट असणारी योगासनं ती अगदी सहज करतेय. हे आसन स्वतः माधवीनं डिझाइन केलं आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘वेगवेगळ्या योगासनांमुळे तुम्ही शरीरात एका विशिष्ट शक्ती निर्माण करता.’

वाजिद यांच्या निधनानंतर आईही करोना पॉझिटिव्ह


माधवी फक्त एकटीच योगासन करत नाही तर ती तिच्या मुलालाही याची गोडी लावत आहेत. तिच्या अनेक इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये तिचा मुलगा रुबेन तिला साथ देताना दिसतो. माधवीने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं. यातही तिने ‘अवघाची संसार’, ‘जावई विकत घेणे’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’ या मालिकांमध्ये काम केलं. तर ‘संघर्ष’, ‘नवरा माझा भवरा’, ‘सगळं करून भागलं’, ‘धावाधाव’, ‘बायकोच्या नकळत’ या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Srinagar terror attack: Srinagar Terror Attack: महाराष्ट्राचा वीरपुत्र यश देशमुख काश्मिरात शहीद; धक्क्याने आई बेशुद्ध – yash deshmukh martyred in terrorist attack in srinagar

जळगाव: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २२ वर्षीय जवान यश दिंगबर देशमुख हे शहीद...

Mamata Banerjee: ‘असा गृहमंत्री आपण यापूर्वी कधीच पाहिला नाही’ – mamata banerjee alleges pm modi amit shah and bjp farmers protest coronavirus issue

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक ( west bengal election ) जवळ येताच राजकारणाचा पारा चढत चालला आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता...

virat kohli: रोहित शर्माच्या दुखापतीबाबत कर्णधार विराट कोहलीने सोडले मौन, म्हणाला… – indian captain virat kohli opens up on lack of clarity, confusion over...

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरु होण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माच्या...

Recent Comments