Home मनोरंजन माधुरी दीक्षित: माधुरी दीक्षितच्या लग्नाला २१ वर्ष पूर्ण, अनोख्या पद्धतीने नवऱ्याला दिल्या...

माधुरी दीक्षित: माधुरी दीक्षितच्या लग्नाला २१ वर्ष पूर्ण, अनोख्या पद्धतीने नवऱ्याला दिल्या शुभेच्छा – madhuri dixit shares photo with husband sriram nene on their wedding anniversary


मुंबई- बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आज शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी तिच्या लग्नाचा २१ वा वाढदिवस साजरा केला. माधुरीने १९९९ मध्ये श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. या खास दिवशी अभिनेत्रीने नेने यांच्यासोबतचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोसोबत तिने पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

माधुरी दीक्षितने शेअर केला जुना फोटो

माधुरी दीक्षितने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पती श्रीराम नेने यांच्यासोबतचे दोन जुने फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘माझ्या आवडत्या माणसासोबत प्रेमाने भरलेलं अजून एक वर्ष सुरू झालं. आपण एकमेकांपासून खूप वेगळे आहोत तर तरीही एक आहोत. तू माझ्या आयुष्यात असणं याचा मला आनंद आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला आणि आपल्याला शुभेच्छा.’


श्रीराम नेने यांनीही शेअर केली पोस्ट

श्रीराम नेने यांनीही माधुरीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना म्हटलं की, स्वत: चे आणि माधुरी दीक्षित यांचे एक चित्रही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. यासह त्याने लिहिले की, ‘२१ वर्षांपूर्वी जोडीदार मिळाला आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक दिवस अविस्मरणीय आहे. लग्नाच्या २१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

आदिनाथ कोठारेने सांगितला करोना काळातला घरातील कठीण प्रसंग


माधुरी दीक्षितने दिले अनेक हिट सिनेमे

माधुरी दीक्षित ने करण जोहरच्या कलंक सिनेमामध्ये अखेरचं काम केलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत संजय दत्त, वरुण धवन आणि आलिया भट्ट देखील होते. बऱ्याच वर्षांनंतर ती आणि संजय दत्त ही सुपरहिट जोडी एकत्र मोठ्या पडद्यावर दिसली होती. माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये ‘देवदास’, ‘हम आपके हैं कौन’, ‘खलनायक’, ‘साजन’, ‘बेटा’ अशा अनेक हिट सिनेमांत काम केलं आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mid Range Smartphone: मिड-रेंज स्मार्टफोन्सवर ५ हजारांपर्यंत सूट, अॅमेझॉन सेलमध्ये बेस्ट डील – amazon great indian sale offer: best deals on vivo y30 to...

नवी दिल्लीः अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये टॉप कंपन्यांच्या बेस्ट स्मार्टफोन्सवर जबरदस्त डील आणि डिस्काउंट सोबत मिळत आहे. सध्या मिड रेंजच्या स्मार्टफोनची डिमांड खूप...

रस्ता ओलांडणाऱ्या दाम्पत्याला चिरडले ट्रकने

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीवरील दाम्पत्य ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच पडल्याची घटना घटना जेलरोडच्या सिंधी कॉलनीसमोर बुधवारी सकाळी अकराला...

Recent Comments