Home संपादकीय मिशन घरवापसी फत्ते

मिशन घरवापसी फत्ते


घराची ओढ ही अशी एक स्वाभाविक प्रेरणा आहे, की ती कोणालाही टाळणे शक्य नाही. करोना संकटकाळात तर ही ओढ अधिकच अलवार झाली. लॉकडाउनमुळे सगळे ठप्प झाल्याने हातावर पोट असणारेच नव्हे, तर चांगला रोज मिळविणारेही संकटात सापडले. या अवघड स्थितीत ‘गड्या आपुला गाव बरा’ हीच कोणाचीही भावना असणार. तथापि, सरकारने तर जेथे आहे, तेथेच थांबायला सांगितलेले. त्यालाही बरेच दिवस लोटल्यानंतर सर्वांचा धीर सुटला. मिळेल तसे हे मजूर ओढीने घराकडे निघाले. शेकडो मैलांची शब्दश: पायपीट करणारे आबालवृद्ध पाहून अनेकांना गलबलून आले; पण पर्याय नव्हता. अशातच वांद्रे प्रकरण घडले. तेव्हाच नव्हे, तर त्यापूर्वीपासूनच अडकलेल्यांसाठी विशेष व्यवस्था करण्याची मागणी सर्वच राज्य सरकारे करीत होती. अखेर तिसऱ्या लॉकडाउनची घोषणा करताना अडकलेल्यांना आपापल्या राज्यात पाठविण्याची सशर्त परवानगी सरकारने दिली. वांद्रे घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने कमालीची काळजी घेतली. नाशिकमधून मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश येथे दोन विशेष गाड्यांमधून १२०० नागरिक गावी रवाना झाले. देशभरात पहिल्या टप्प्यात अशा चार गाड्या धावल्या आणि कामगार दिनीच या रंजल्या-गांजलेल्यांना श्रमिक रेल्वेची भेट मिळाली. मुंबापुरीतून निघालेल्या; पण नाशिकला अडवलेल्या दोन हजार मजुरांची गेला दीड महिना निवारागृहात व्यवस्था होती. त्यांची नियमित तपासणी होत असे. सक्तीचे विलगीकरण संपताच प्रशासनाने त्यांच्या परतीची चोख व्यवस्था केली. आरोग्य तपासणी, सुरक्षित वावर, जेवण व मास्क; तसेच सॅनिटायझरचा पुरवठा अशी सर्वंकष काळजी घेतली गेली. सुदैवाने, यापैकी कोणालाही करोनाची लक्षणे नसल्याने ही पाठवणी समाधान देऊन गेली. समाजमाध्यमांच्या हैदोसातही या बातमीची गुप्तता पाळली गेली. परिणामी, कोणताही गोंधळ न होता काटेकोरपणे हे मिशन यशस्वी झाले. महाराष्ट्रदिनी मिळालेल्या या भेटीने हे मजूर एवढे भावविवश झाले, की त्यांनी उत्स्फूर्तपणे व कृतज्ञतेने महाराष्ट्राचा जयजयकार केला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virat kohli: सर्वाधिक गुण असूनही भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर; विराट कोहलीने आयसीसीला विचारला सवाल – it is confusing, difficult to understand: virat kohli on...

सिडनी : भारतीय संघाचे सर्वाधिक गुण असूनही आम्ही दुसऱ्या स्थानावर का, असा सवाल भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयीसीसीला केला आहे. आयीसीसीचा नवा नियम...

illegal sand mining: Illegal Sand Mining: वाळू माफियांच्या टोळीत भाजप नगरसेवक; पोलिसांवर डंपर घालण्याचा प्रयत्न – illegal sand mining case filed against 12 including...

जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली...

Manohar Lal Khattar: ‘शेतकऱ्यांना MSP बाबत कुठलीही अडचण आली, तर राजकारण सोडून देईन’ – manohar lal khattar targets punjab cm captain amarinder singh on...

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws) शेतकऱ्यांनी मोर्चा ( farmers protest ) उघडला आहे. आता त्यावरून राजकार रंगलं आहे. पंजाबचे...

Recent Comments